सांगली | मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.ट्रस्ट ) इन्फोटेक फिचर्स इव्हेंट मॕनेजमेंट एजन्सी मुंबई आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद २०१८चे गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा नुकताच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र ,मुंबई महाराष्ट्र राज्य येथे संपन्न झाला.जत तालुक्यातील पांडोझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्तीचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार यावेळी देण्यात आला. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
वाघमारे यांनी शाळेत विविध उपक्रम राबविले आहेत.शाळेत वृक्षलागवड,स्वच्छता ,शैक्षणिक उठाव,दुष्काळी परिस्थितीतही शाळा परिसर हिरवागार करण्याबरोबर सुट्टीच्या कालावधीतही पालक विद्यार्थी सोबत घेवून वृक्षसंगोपन साठी व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.अनेक मासिकेत व विशेषांक व वृत्तांत लेख व कविता प्रकाशित झाले आहेत.मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार देण्यात आला.या पुरस्काराचे वितरण कृष्णाजी जगदाळे व प्रकाश सावंत ,के.एल.गोगावले , यांच्या हस्ते करण्यात आले. वेळी एच.डब्ल्यूच्या सहसंपादक पूनम कुलकर्णी,अमोल सुपेकर,रमाकांत सोनकांबळे व राज्यातील सर्व तसेच जिल्ह्यातील गुणिजन उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा