अखेर बिलोली व कुंडलवाडी येथील रूग्णालयांच्या श्रेणीवर्धनाचा शासन आदेश जारी
बिलोली
शहरातील ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय स्थापन करणे व तालुक्यातील कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्याबाबत चा शासन आदेश दि.१३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला.
बिलोली हे शहर राज्य महामार्गावर आहे.या तालुक्यात जवळपास ८५ गावांचा समावेश आहे.अशात एखादी दुर्घटना घडल्या रूग्नांना बिलोली पासून दिड तासाच्या अंतरावर असलेल्या नांदेड येथे उपचारासाठी जावे लागते.त्यामुळे बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयाचे उप जिल्हा रूग्णालयात तर कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर रूपांतर व्हावे अशी मागणी तालुक्यातील जनतेच्या वतीने ब-याच वर्षापासून करण्यात येत होती.अशातच सिमावर्ती भागातील विकासा संदर्भात सुरू झालेल्या चळवळीच्या समन्वयकांनीही बिलोली येथे उपजिल्हा व कुंडलवाडी येथे ग्रामीण रूग्णालयाची मागणी केली होती.बिलोली तालुक्यातील कार्ला फाटा येथे सिमावर्ती प्रश्ना बाबत झालेल्या बैठकीत प्रसंगी सामूहिक आत्मदहन होणार असल्याच्या बाबी पुढे आल्या होत्या. देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष साबणे यांनी उप जिल्हा व ग्रामीण रूग्णालयाबाबत प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून पाठपुराव्याने अभिवचन दिले होते. आ.साबणे यांनी केलेल्या विधानानुसार बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयाचे उप जिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याच्या आदेशावर दि.१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली होती.बिलोली व कुंडलवाडी येथील रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनाला मंजूरी मिळाल्यानंतर याबाबत शासन आदेशाची उत्सुकता होती याबाबत मंत्रालयात चौकशीही करण्यात आली होती दीपावलीच्या सुट्ट्या असल्यामुळे अखेर दि.१३ नोव्हेंबर रोजी बिलोली व कुंडलवाडी येथील रूग्णालयांच्या श्रेणीवर्धनाचा शासन आदेश मा.राज्यपालांच्या आदेशानुसार व अवर सचिव प्रदिप म.बलकवडे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा