नायगाव तालुक्यातील श्री सद्गुरु नराशाम विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु.सना आसिफ पठाण या हरहुन्नरी अष्टपैलू कलावंत विद्यार्थ्यांनीने ग्रीन व्ह्याली इंग्लिश स्कूल नायगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय सी.एम.चषक नृत्य स्पर्धेत शालेय वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रकारात नायगाव तालुक्यातुन सर्व द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे.विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकतेची वाढ व्हावी.सुप्त कलांगुणांची जाणिव जागृती व्हायला हवी म्हणून या आगळ्या वेगळ्या उपक्रमांचेे आयोजन भा.ज.पा.तर्फे करण्यात आले होते.स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रसिद्ध नृत्यसम्राट दिनेश लोंढे,प्रदीप राठोड सर हे उपस्थित होते. सनाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थापक मा.खा.भास्करराव पा.खतगावकर,सचिव मा.बाळासाहेब पा. खतगावकर,जि.प.सदस्या डाॅ.सौ.मिनलताई पा.खतगावकर,रवी पा.खतगावकर, मुख्याध्यापक जाधव सर,चोंडे सर,शेख सर,वाघमारे सर,पवार सर, कपाळे सर,गायकवाड मॅडम,अन्सापुरे सर,पांचाळ सर,गोविंद चोपवाड मामा,टेंभुर्णीकर मामा अदिंनी तिचे अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यीनीस सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा कथाकार बालाजी पेटेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल परिसरातील मान्यवरांतर्फे तिचे कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा