बिलोली प्रतिनिधी:-सी.एम.चषक भाजपाच्या वतीने सांस्कृतिक सभागृह बिलोली येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय गायन स्पर्धेत गायिका कु. योगेश्वरी बालाजीराव पेटेकर खतगावकर हिने प्रथम स्थान पटकावले.तर तिचे वडिल बालाजी पेटेकर खतगावकर यांनी जयराम अंबेकर विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.एकाच तालुक्यातुन दोघे बाप लेक प्रथम येण्याची ही पहिलीच वेळ आहे.ही अनोखी किमया त्यांनी केल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्यातील प्रतिभावंत गुणांनी लेकीने गायनाची तर बापाने रांगोळीतुन कलेची झलक दाखवुन दिली.योगेश्वरी ही प्रसिद्ध ग्रामीण कवी,कथाकार तथा चित्रकार बालाजी पेटेकर खतगावकर यांची कन्या आहे.या पुर्वी ती राज्यातील सर्व जिल्ह्यातून आलेल्या दिग्गज स्पर्धकांतुन सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक मिळवले होते .या पुर्वी "प्रितीचा गारवा"या अल्बम मधील गायलेल्या बहारदार मोबाईल लावणी ने ती घराघरात पोहचली. बाप-लेकिना मिळालेल्या या यशाबद्दल,पत्रकार बंधु,कवी,साहित्यिक,कला,संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. संगीत व रांगोळीत जिल्ह्याची मान उंचावण्याच्या या अभिमानास्पद यशाबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातुन अभिनंदनाचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा