०२ जानेवारी २०१९

बिलोलीत आज सी.एम चषक चे बक्षिस वितरण


बिलोली येथील पठे बाबूराव रंगमंच येथे सी.एम चषक चे 12 खेळाचे बक्षिस वितरण होणार आहे या कार्यक्रमांचे अध्यक्ष  मा.श्री .भास्करराव पाटील खतगावकर मा. मंञी तथा  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तर
कार्यक्रमाचे उदघाटक आमदार राम पाटील रातोळीकर , भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष  रवि पाटील खतगावकर   व ईतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.  या कार्यक्ररमात 12 खेळातील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणा-या खेळाडूंना बक्षिस वितरण व प्रशस्तीपञ देण्यात येणार आहे. सदरिल कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता पठ्ठे बाबुराव रंगमंच बिलोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायीका योगेश्वरी पेठेकर , नृत्य लावणी सम्राज्ञी  वैशाली पुणे , शाहिर नागोराव वाघमारे यांचा संच , नृत्य स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.   तरी देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातील सर्व नागारीक, पदाधिकारी, कार्यकर्ते , पञकार बांधव , प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थिती राहण्याचे अव्हान भाजपा युवा मोर्चाचे ता. अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, प्रतिक अंकुशकर , सय्यद रियाज,  बळवंत पा. लुटे, राजू गादगे , यांच्या वतिने करण्यात आले.

२ टिप्पण्या:

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...