महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील सन्मान माईचा सत्कार सु -हदयी व्यक्तींचा या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि तेलंगणातील विविध आमदारासह कुलगुरू आणि जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.महाराष्ट्रातील आणि तेलंगणातील विविध आमदार आणि खासदारांना विविध प्रश्नावर सचेत करणारे प्रश्न सीमावर्ती भागाचे यांच्या समन्वयकांच्या पुढाकाराने सीमावर्ती भागात सन्मान माईचा कार्यक्रम होत आहे. या अंतर्गत सत्यपाल महाराजांची सत्यवाणी आणि मान्यवरांचा सत्कार तसेच सर्व सीमावर्ती भागातील मातांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सात जानेवारी 2019 रोजी सोमवारी बिलोली शहरातील दुर्गामाता मंदिराजवळ होणार आहे.या कार्यक्रमात शिवसेनेचे देगलूर चे आमदार श्रीयुत सुभाषराव साबणे, तेलंगणाचे बोधन मतदारसंघाचे आमदार मोहम्मद शकील भाई अमिर यांच्यासह तेलंगणातील आणि महाराष्ट्रातील विविध आमदारांची उपस्थिती राहणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले आणि पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि मातांचा प्रातिनिधिक स्वरूपात बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती भागीरथीबाई बसवंतराव मुंडकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर सीमावर्ती भागातील सर्व श्रोत्यांसाठी सत्यपाल महाराजांची सत्यवाणी हा कार्यक्रम होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा