बिलोली - सगरोळी संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र व कौशल्य विकास कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्दमानाने “शेती अवजारे निगा व दुरुस्ती” या विषयी एक महिन्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी झाले. या प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी श्री. राहुल देशपांडे, ब्लु स्टार इंडिया लि. यांनी उपस्थित प्रशिक्षनार्थी व्यवसायात यशस्वी होण्याचे ७ मंत्र सांगितले. तसेच संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन मा.प्रमोद देशमुख यांनी ग्रामीण भागातील तरुणामध्ये कौशल्य विकास करणे आजच्या काळाचे गरज आहे. आणि त्या करिता अशा प्रकारचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्रात घेण्यात येतील असे सांगितले. श्री वैजनाथ बोंबले यांनी प्रास्ताविकात या प्रशिक्षनात टॅक्टर निगा व दुरुस्ती, शेती अवजारे योग्य वापर फवारणी यंत्राची निगा दुरुस्ती,व मोटर रीवांडीग इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. व श्री व्यंकट शिंदे यांनी सूत्र संचालन केले व श्री सचिन कोटनोड यांनी आभार मांडले.ङाङ कार्यक्रमाचे उद्घाटन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा