बिलोली (प्रतिनिधी )
तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त गावातील उपाय योजने अंतर्गत येणार्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार श्री विक्रम राजपुत साहेबानां देण्यात आले. तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त गावांमध्ये शासनाकडुन विविध योजना दुष्काळ निवारणा संदर्भात येतात पण त्या योजनेची अंमलबजावणी योग्य रित्या होत नसल्या कारणाने या योजनांचा लाभ शेतकरी वर्गाला मिळत नाही योजना येतात हे खरे पण ते शेतकर्यापर्यंत पोहचतात कि नाही हे पाहण्यासाठी संबंधित यंत्रणा अपयशी ठरत आहे फक्त कागदोपत्री योजनेची अंमलबजावणी शासनाकडुन होत असल्याचा ठपका मनसेने ठेवला आहे.
सर्व विहीरी व तलावातील गाळ काढणे. विहीरीची दुरुस्ती करणे. टचाईग्र्स्त गावात पाच हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी बाधणे. म न रे गा योजना प्र्भाविरित्या राबविणे लाभधारकाना शिधापत्रीका देणे. आदि मागण्याचा समावेश निवेदनात करण्यात आला. निवेदनात शासकिय योजनाची यादी तहसिलदाराना देण्यात आली. म. न. से .चे तालुका अध्यक्ष शकर महाजन ,गणेश पाटील डोनगावकर ,शिवा शिवशेटे गजानन चितले , मनोहर वसमते , साहेबराव कोन्डावार मुजाहिद शेख, विजय घोगरे, दत्ता हान्डे , शकर बोढडके आदि चे सहीने निवेदन पत्र देण्यात आले. सात दिवसात मागण्या मान्य नाही झाल्यास मनसे स्टाईल आदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला.
Jay mns
उत्तर द्याहटवाjay manse yag
हटवाdam brobar ahe