नांदेड- गोवर व रूबेला हा घातक विषाणूजन्य आजार मुळापासून नाहीसा करण्यासाठी भारत सरकार सन २०१७ पासून एम. आर. लसीकरण मोहीम राबवीत आहे. या अंतर्गत महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळेत व आरोग्य केंद्रात ही मोहीम नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ मध्ये राबविली आहे. त्याचे पुर्ण लसीकरण राउँड अद्यापही चालू आहेत. शासनाने सर्व प्रकारची जनजागृती ह्या लसी विषयी केलेली आहे. तरीपण बरेच विद्यार्थी, मुले व मुली ( ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील) यांनी ही लस अद्याप घेतलेली नाही.
डॉ होमीभाभा यंग सायंटीस्ट परीक्षेसाठी निवड झालेल्या सहावीच्या वर्गातील विद्यार्थी अनीश राजेश्वर माचेवार याने व त्याच्या स्थानिक ग्रुपने गोवर रूबेला लसीकरणासाठी सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी ज्या भागात, वस्तीत व शाळेत एम. आर. लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. त्या भागात जावून बालकांशी व पालकांसोबत चर्चा व संवाद साधला. लसीकरण का केले नाही याची कारणे जाणून घेतली व पालकांच्या मनातील शंका, प्रश्न याचे निरासन केले. तसेच एम.आर. लसीकरण १०० टक्के केले तरच हा घातक आजार नाहिसा होवू शकतो.
. या मोहिमेत त्याला डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉ आय.एफ. ईमानदार, नांदेड महानगरपालिकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ रिझवान, डॉ गजानन मुनगीलवार, डॉ कल्याण पवार व डॉ रितेश बिसेन यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा