०८ फेब्रुवारी २०१९

बिलोली येथे डाॕ.वहीदओद्दीन फारुखी यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन


बिलोली येथील जुना बस्थानक 
परिसरात राहणारे डॉ एम.डब्ल्यू फारुखी यांचे ( वहियोद्दीन फारुखी ) ह्दयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.फारुखी यांनी आर.सी .एम.एस डि.एन टि. आय ( पुणे ) येथुन शिक्षण घेतले  ते बिलोली तालुक्यातील प्रसिद्ध असे जुने डॉक्टर म्हणून आज ही प्रसिद्ध होते ते  अल्प दरात रुग्णांची सेवा केली वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी निसवार्थी काम  केले . त्यांनी त्यांच्या काळात अनेक पदावर काम केले .  विशेष कार्यकारी दंड अधिकारी , कॉग्रेस पक्षाचे  निष्ठावंत आणि निस्वार्थ नेते  होते  ते माजी अल्पसंख्यांक  तालूका अध्यक्ष म्हणून ही काम केले ,  पञकार क्षेत्रात ही वर्तमानपञा द्वारे नागरीकांना न्याय देण्याचा काम त्यांनी केले . दैनिक गोदातीर तसेच ते बहुभाषीक पञकार संघाचे  मा. तालूका अध्यक्ष ही होते , व तसेच मा.अध्यक्ष शिक्षण समिती कन्या शाळा बिलोली  , भाषारत्न "भुषन" मा.तालूका सचिव हिंदी प्रचार सभा हैद्राबाद ,मा. तालूका सचिव निसर्ग उपचार केंद्र . मा  तालूका अध्यक्ष शरियत कमीटी,  सदस्य - दक्षता कमिटी एस.टी. महामंडळ  अदी पदावर त्यांनी काम केले आहे.
डाॕ. फारुखी यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्या मुळे बिलोली तालूक्यात हळ हळ व्यक्त होत आहे  ते पञकार वलिओद्दिन फारुखी यांचे वडील होते.फारूखी यांचे जनाजे नमाज असर  ठिक 5:00 (दफनविधी)  जामा मस्जीद बिलोली येथे होईल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...