नांदेड - समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे सकाळी ०७.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला .सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली
समाज कल्याण कार्यालयातील सर्व कामगारांचा सत्कार करण्यात आला .व सोबतच मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि. आपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो हे समजलं पण “जागतिक कामगार दिन” हा सुद्धा १ मे रोजीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो
दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या
वर्षे लोटली तशतशा अधिकाधिक देशांतल्या तुकडया १ मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिवस साजरा करु लागले आणि १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिनात होऊ लागला. १ मे दिवस ही सर्व कामगार चळवळीची परंपरा झाली
यावेळी सोबतच कामगार प्रवीण ढेंबरे , संजय मंत्री,संजय कोसवे ,विकास अदावर्ते,नरवाडे ,वैशाली जाधव ,राधा देवडे ,दत्ता पाईकराव या सर्व कामगारांचा बार्टी च्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अविनाश जोंधळे यांनी केले तर समतादूत विनोद पाचंगे व महेश इंगोले यांनी मार्गदर्शन केले.व समतादूत ज्योती जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समतादूत दीपाली हाडोळे ,राणी बंडेवार,ज्योती जोंधळे ,सचिन घुले ,खंडू फोले,जगदीश निवळे,दिगंबर पोतुलवार ,बालाजी डुमणे ,दिलीप सोंडारे ,शारदा माले,प्रीती जमदाडे, इर्शाद मौलाना यांनी परिश्रम घेतले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा