नांदेड (प्रतिनिधी) नांदेड येथील गाडेगाव गावाजवळील आसना नदीच्या वाळूच्या रात्री बेसुमार उपसा करून शासनाला लुटले जात असल्याची स्थिती नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी तेथील ग्रामस्थांनी गावचे सरपंच यांच्या पतीच्या अर्थात बाबुराव च्या पुढाकाराने होत असलेल्या प्रकाराबाबत म्हणाले की काय चाललय बाबुराव बरे आहे काय असण्याची वाळू चोरी होते खर आहे का ?
नांदेड येथील गाडेगाव गावाजवळून आसना नदी वाहते या नदीच्या पात्रातील वाळू रात्रीला चोरीला जाण्याचा प्रकार बिनधास्त होतो. या बाळू चोरीच्या प्रकरणाला प्रशासनाचे स्थानिक प्रतिनिधी तलाठी आणि पोलिसांचे आशीर्वाद असल्याचे मान ले जाते. नांदेड शहरालगत असलेल्या गाडेगाव या गावातील वाळू चोरीबाबत पोलीस आणि प्रशासन योग्य ती कार्यवाही कळत नसल्यामुळे पोलीस आणि प्रशासनाच्या उपलब्धतेविषयी शंका व्यक्त केली जात विशेष म्हणजे गाडेगाव येथे कुठल्याही रेतीचा लिलाव झालेला नसताना रात्री वाळूची चोरी केली जात आहे याबाबत प्रशासनाने आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान या वाळू चोरी प्रकरणात सरपंचाचे पती बाबुराव यांचा पुढाकार असल्यामुळे येथील ग्रामस्थ अलगदपणे विकृतीवर बोट ठेवत काय चाललय बाबुराव बरं आहे काय आसनाची वाळू चोरी होते हे खरे आहे काय असं म्हणून याबाबत शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी चे लक्ष वेधताना दिसून येत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा