बिलोली- बिलोली शहरातील प्रभाग क्र.०७ देशमुख नगर येथे सी.सी.नालीचे बांधकाम गेल्या २५ वर्षापासून न झाल्यामुळे येथील नागरीकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की,नगर परिषद बिलोली कडुन गेल्या २५ वर्षापासून देशमुख नगर मधील एका भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे .निवडून येणारे नगरसेवक फक्त गेल्या २५ वर्षापासून फक्त आश्वासन देत आहेत.
नालीचे बांधकाम न झाल्याने येथील भागात हिवताप ,डेंग्यू , मलेरीया आशा विविध आजारांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे.
ह्या साठी येथील नागरिकाःमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .सदर बाब येथील राहिवाशी शेख इर्शाद मौलाना ह्यांनी नगर परिषदेच्या निदर्शनास निवेदन च्या माध्यमातून व प्रत्यक्ष आणून दिली .
तद्नंतर ११ सप्टेंबर २०१८ रोजी नगर परिषद तर्फे सदर नालीच्या बांधकामची निविदा काढण्यात आली .परंतु आज ०१ वर्षे पूर्ण होत असले तरीही परिस्थिती "जैसे थे "ची आहे
तसेच सदर भागात सी.सी.रोड चे काम थातूर-मातूर पध्दतीने झाल्याने वर्षभरात रोडचे सर्वत्र तुकडे पडले आहेत.व सदर भागात येण्या-जाण्या साठी नालीवर टाकण्यात आलेले स्लब तुटुन पडले आहेत .व सध्या सदर भागामध्ये येण्यासाठी फक्त एक रस्ता शिल्लक आहे.
ह्यासाठी येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे .
सध्या पावसाळ्याचे दिवस आसल्यामूळे सदर भागात पाण्याचे डबके तयार होऊन घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.ह्यासाठी लहान मुलामध्ये जास्त प्रमाणात रोगराई पसरत आहे.ह्यामुळे लहान बालके दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ह्यासाठी सदर परिस्थिती वर मात करण्यासाठी येथील राहिवाशी इर्शाद मौलाना यांनी नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांच्याकडे धाव घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा