३१ जुलै २०१९

मा.बालाजी बच्चेवार एक संघर्षयोद्धा

लेख


        नांदेड जिल्हा हा एकहाती सत्ता केंद्र आणि घराणेशाही व राजेशाही या दोन तत्वांवर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असा काहीसा समज   जनमानसांत पसरलेला असतानाही अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत नायगाव मतदारसंघाचे भावी आमदार,भा.ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.बालाजी बच्चेवार साहेब यांनी स्वबळावर नायगाव मतदार संघातील  जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधकांच्या फेकलेल्या चिखलात सुध्दा कमळ फूलविल्याचे आपल्या सर्वांना मागील जिल्हा परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने अनुभवास मिळालेच आहे.

 आजमितीस मा.श्री.बालाजी बच्चेवार साहेब नायगाव मतदारसंघाचा तारणहार, आपल्या चाणाक्ष बुध्दीमत्तेच्या जोरावर मतदारसंघातील गावांच्या विशेषतः वैयक्तिक जनतेच्या अडीअडचणीं व समस्यांवर मात करणारा अभ्यासू नेता , सर्वसामान्य जनतेचा आधार, विरोधकांचा कर्दनकाळ, तरूणांच्या गळ्यातील ताईत, अबाल वृध्द लोकांचा सहारा आणि विशेषतः नायगाव मतदारसंघाबरोबरच नांदेड जिल्ह्यातील भाजप पक्षाचे एक गंभीर नेतृत्व असा राजकीय प्रवास अखंडपणे हाताळत आहेत.

नेतृत्व अनेक वर्षांच्या कामांतून आणि अथक परिश्रमांतून घडते. त्याच्या आयुष्यात रात्रंदिवस युद्धाचे प्रसंग येतात. अग्निपरीक्षेत उत्तीर्ण झालेले नेतृत्व हे स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रकाशित असते.
 लोककल्याणासाठी सातत्याने झटणारा नेताच लोकमानसात उतरतो, हे वेगळे सांगण्याची आवश्‍यकता नाही.
 मा.बालाजी बच्चेवार साहेब यांचे नेतृत्व हे लोकमानसात पूर्णपणे मुरलेले नेतृत्व आहे. असा नेता सत्तेवर असला काय किंवा नसला काय, तो लोकांच्या विळख्यातच असतो. तो आपली नाळ लोकांपासून तुटू देत नाही. लोकांच्या नाडीवर बोट ठेवून तो लोकांशी संवाद साधतो. बच्चेवार साहेबांचा दांडगा लोकसंपर्क आहे. लोकशाहीत लोकसंग्रह हीच खरी संपत्ती असते.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी कामांचा डोंगर रचला आणि कर्तृत्वाचा सह्याद्री उभा केला.
 बच्चेवार साहेबांच्या राजकारणाला समाजकारणाचा आशय प्राप्त झालेला आहे. राजकारण हे साधन असते आणि असले पाहिजे, समाजकारण हे साध्य असते, या गोष्टीचे भान या नेत्याला आहे.


जिद्दी, करारी, गोरगरीबाप्रति प्रचंड तळमळ, समाजाचे प्रश्‍न सोडविण्यसाठी स्वत:ला वाहून घेण्याची धडपड, पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेण्याची वृत्ती. शेतकर्‍यांच्या जीवनात खुषी निर्माण व्हावी म्हणून जीव झोकून देत काम करण्याची दानत या गुणांमुळेच आमचे बालाजी बच्चेवार दादा आज नायगाव मतदारसंघाच्या पटलावर तार्‍यासारखे चमकत आहेत. दीन-दुबळे, रंजले गांजले, पीडीतांचे, बापड्याचे, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दादा निष्ठेने, तळमळीने अन् जिद्दीने काम करतात. म्हणूनच आज बच्चेवार साहेब म्हणजे विश्‍वासार्हता हे दुर्मीळ समीकरण आजच्या काळातही रुढ झालयं.
 आपल्या विलक्षण निर्णयक्षमतेच्या जोरावर साहेबांकडे गेले की काम मार्गी लागलेच म्हणून समजा, हा सर्वसामान्यांच्या मनात साहेबांनी विश्‍वास निर्माण केला आहे.
 गाव केंद्रबिंदू मानून तेथील रंजल्या-गांजलेल्यांची परिस्थिती पाहात तातडीने लोकाभिमूख निर्णय घेतात हा त्यांचा गुण सामान्यांना इतका भावतो की नेता असावा तर बालाजी बच्चेवार साहेबांसारखाच! अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

सर्वसामान्यांचे प्रश्‍न तडीस जावे, बापड्यांना न्याय मिळावा, शेतकर्‍यांना जीवनात असलेल्या दु:ख आणि संकटाची कायमचीच फारकत व्हावी, यासाठी कोणत्याही अडथळ्यांची तमा न करता साहेबांचीची सतत घौडदौड सुरुच असते.
निष्कलंक आणि सामान्यातील सामान्य माणसाला न्याय देण्याची बच्चेवार साहेबांची दुर्दम्य इच्छाशक्ती लोकांना इतकी भावली आहे.
 कायदा लोकांच्या भल्यासाठी असतो, विकासासाठी कायदा आड येत असेल तर तो बाजूला करा, असे साहेब प्रशासनाला सतत बजावत असल्याने साहेबांच्याच्या मनातील सर्वसामान्यांविषयीच्या असलेल्या आपुलकीचे दर्शन होते.

   

लेखक -  राहुल पाटील ममदापुरकर...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...