बिलोली - निवासी मूकबधिर विद्यालय गांधीनगर येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बिलोली न.प.चे नगरसेवक प्रतिनिधी अमजद चाऊस व तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .तसेच मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि,०१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती दिन निमित्त प्रथम फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी तालुका समतादूत शेख आय.एम.यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम चे सूत्र संचलन सहशिक्षक बी.व्ही..ठक्करवाड यांनी केले तर आभार शाळेचे मु.अ.सय्यद एल.एच. यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सहशिक्षक बी.व्ही..ठक्करवाड ,ए.जी.पाटील ,व्ही.एम.देवाले,ए.सी.भुसारे ,व आर.जी.हंबर्डे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा