कंधार ( शेख शादुल )
एक सामान्य कार्यकर्ता म्हणून चळवळीतून खडतर प्रवास करताना शेतकरी नेते म्हणून ओळख निर्माण केलेले कंधार , लोहा मतदार संघाचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी मतदार संघातील जन्मानसाच्या भेटी गाठी घेऊन संवाद साधावा यासाठी गेली २१ जुलै पासून विकासाची पाऊल वाट काढली असून दररोज ३० ते ४० किलोमीटर चा ते स्वतः कार्यकर्त्या सोबत पायी प्रवास करत आहेत , हीच शंकर अण्णाची विकासाची पाऊल वाट येणाऱ्या काळात कंधार , लोहा मतदार संघात परिवर्तनाची लाट ठरणार असा विश्वास जनमानसाला वाटतो आहे.
गेली १९ दिवसापासून मजल दरमजल करत या मतदार संघातील अनेक गावं , वाड्या, तांडे येथे भेटी देत ता. ९ ऑगस्ट रोजी गऊळ वरून महादेव तांडा , केवळ तांडा , सोमसवाडी , मुंडेवाडी करून अण्णांची पदयात्रा फुलवळ मुक्कामी पोहचली अन जुन्या , नवीन कार्यकर्त्यांसह जनमानसात एक नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.
यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या सोबत दत्ता पवार , बाबुराव केंद्रे , डॉ. सुनील धोंडगे , दिलीप धोंडगे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. फुलवळ येथे नारायण मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत बोलतांना शंकर अण्णा म्हणाले की , आपल्या मतदार संघात अकार्यक्षम व लबाड , लुटारू लांडग्यांचा सुळसुळाट झाला असून लोकप्रतिनिधी तसे अधिकारी बनले आहेत त्यामुळे तुमच्या , आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला अनेक सुख , सोयी सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे.
गेली पाच वर्षाच्या काळात आपल्या मतदार संघात विकासाची पार वाट लागून गेली असून आपल्या भागात ना रस्ते नीट आहेत , ना पिण्याच्या पाण्याची सोय , ना लाईट , ना सिंचन , शिक्षण एवढेच काय तर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चा मोबदला आला ना यंदाचा पीकविमा आला . मग अशा मूलभूत सुविधा जर तुम्हाला मिळत नसतील तर हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी , खुर्ची वर असणारे मस्तवाल अधिकारी काय कामाचे . आपल्या अडचणीला हे नाहीत तर मग यांच काय लोणचं घालायचं का ? असा सवाल हि त्यांनी उपस्थित केला. आणि आपल्या हक्काचं जर आपल्याला वेळेत मिळत नसेल तर हे सरकार कोणाच्या कामाचे .
आपल्या मतदार संघाचा कारभार धनी नसल्यागत झाला असून सामान्य जनता वाऱ्यावर पडली आहे. मी गेली १९ दिवसापासून पायी चालत फिरतोय आणखी ५ सप्टेंबर पर्यंत असाच पायी फिरणार आहे हे माझ्यासाठी नाही तर मतदार संघातील प्रत्येक माणूस जागा व्हावा म्हणून प्रयत्न करतोय जर तुम्हाला स्वतःची आणि कुटुंबाबरोबरच गावाची , देशाची चिंता असेल तर प्रिवर्तनाशिवाय पर्याय नाही. अन्यथा येणारा काळ यापेक्षाही चिंताजनक असेल याचा विचार आपण आजच केलेला बरा असा मोलाचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
ढोलताशांच्या गजरात फुलवळ गावात शंकर अण्णाची रॅली काढण्यात आली यावेळी नागनाथ मंगनाळे , अशोक मंगनाळे , शिवसांब फुलवळे , संतोष तेलंग , शिवाजी बोरगावे सह गावातील अनेक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा