नायगाव
भारतीय राजकारणातील उत्कृष्ट भाषण संभाषण कौशल्य असणाऱ्या देशातील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या जाण्याने भाजपतील एक कार्यकुशल बहुआयामी व्यक्तिमत्व हरपल्याची खंत भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केली ते नायगाव शहरातील शिवाजी चौक येथे आयोजित शोक सभेत बोलत होते. भारतीय जनता पार्टी तालुका नायगाव च्या वतीने माजी केंद्रीमंत्री सुषमा स्वराज यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो या उद्देशाने शहरातील शिवाजी चौक येथे शोक सभा भजपाचे नायगाव तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे यांनी आयोजित केली होती. याप्रसंगी भा नेते बालाजी बच्चेवार, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगाव हिंद युवा परिषदेचे रणजीत देशमुख, भाजपा सरचिटणीस व्यंकट पाटील चव्हाण, अडत व्यापारी लांगडापुरे, शंकर पाटील लाबदे,, बाबुरावे, यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी आदरांजली वाहिली. यावेळी भाजपाचे बालाजी तळणीकर, समर्थ शिंपाळे, सचिन भोकरे, बाळू मुदखेडे, संजय मोरे आदींसह नायगाव शहर व परिसरातील बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा