बिलोली ता.प्र
तालुक्यातील मौ.नागापुर येथिल युवा शेतकरी चक्रधर दताञ्य कदम १८ वर्षे यास आज दि.६ आँगस्ट बुधवार रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास गावालगत आसलेल्या स्वतःच्या शेतात सोयाबीन पिकावर आलेल्या किडआळीची पहाणी करीत आसताना सदरील शेतात बोअरसाठी विद्युत पुरवठा होणाऱ्या तार पिकात तुटुन पडल्याने नजर चुकीने त्या तारेला पायाला स्पर्श झाल्याने त्या युवा शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोकाकुल वातावरण पसरले आसुन या घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष साबने यानी तात्काळ भेट देऊन कुंटुबास आर्थिक मदत देऊ केली.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी पा.शिंदे बिलोली न.पा.मा.नगराध्यक्ष यादवराव तुडमे शिवसेना ता.प्रमुख बाबाराव पा.रोकडे विश्वनाथ समन ,इंद्रजीत तुडमे यानी कुटुंबाचे सांत्वन केले.आज संध्याकाळी ५ वाजता शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा