०५ ऑगस्ट २०१९

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे याच्याबद्दल गैरशब्द काढणारे मंत्री रामदास आठवलेच्या पुतळ्याचे कंधार येथे दहन करुन मातंग समाजाच्या वतीने निषेध



कंधार (शेख शादुल)


पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल जाणीव पुर्वक अपशब्द वापरुन महामानवाची विटंबना करुन मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
बँन्ड वाल्यांना कमी लेखून गैरउदगार काढूण मातंग समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल दि.५ अॉगस्ट रोजी रामदास आठवले यांच्या   प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन कंधार येथिल मातंग समाजाच्या वतिने निषेध करण्यात आला व कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांनी जाणीव पुर्वक अपशब्द वापरुन
महामानवाची विटंबना करुन मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच सोबत असलेल्या
बँन्ड वाल्यांना हालक्या, हालकीवाले असे गैरउद्गार काढून त्यांना अपमानीत केले त्यामुळेही मातंग
समाजाच्या भावना दुखावल्या आहे.
तरी त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. मातंग समाजाची जाहिर माफी मागावी व त्यांना
मंत्रीपदावरुन हाटविण्यात यावे. अन्यथा मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात
येईल. याची प्रशासनाने दखल घ्यावी,  जर काही प्रकार घडल्यास त्याला जबाबदार प्रशासन
राहील असे निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर राजु मळगे,मारोती गायकवाड ,साईनाथ मळगे,महेंद्र कांबळे ,माधव डोम्पले ,अशोक गायकवाड ,विठ्ठल निळकंठे,आकाश घोडजकर ,संतोष वाघमारे ,विशाल कांबळे ,नागनाथ वाघमारे ,मनोज कांबळे ,अभिजीत कांबळे ,रंजीत भैले,सचिन गडंबे,परमेश्वर देवकांबळे ,पिराजी कंधारे ,यादव कंधारे ,शिवराज दाढेल,आनंद वाघमारे आदीसह समस्त मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...