०६ ऑगस्ट २०१९

भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस -पांडुरंग शिंदे

.
   
    जम्मू काश्मीर मधून कमल ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात येत आहे घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केली, दि ५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणून गणला जाईल असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा म्हाडाचे संचालक पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी अभिमानाने प्रतिक्रिया दिली.

   कलम ३७० रद्द केल्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शहा व सरकारचे एतिहासिक निर्णय घेतल्याबदल हार्दिक अभिनंदन करतो.गेल्या ७० वर्षांत जे शक्य नव्हते ते मोदी सरकारने ६ वर्षांत करून दाखविले आहे मोदी है तो मुमीकन है.

    आज खऱ्या अर्थाने या निर्णयामुळे जम्मू काश्मीरच्या प्रगतीची दारे उघडली जातील व तिथल्या लोकांचे जीवनमान उंचावले इतर राज्याप्रमाणे तिथे शांतता नांदेल,या शांततेचा परिणाम भारत देशाचे शांततेवर होईल.

  या पुढे जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा झेंडा अभिमानाने फडकत राहील व भारतीय राज्यघटना हीच एकमेव घटना असेल आणि जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून जम्मू काश्मीर व लडाख वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश राहणार आहेत.

1 टिप्पणी:

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...