०४ सप्टेंबर २०१९

जाफर आदमपूरकर चे हिंदी गीत टी-सिरीज ला रिलीज


नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा कवी, गीतकार जाफर आदमपूरकर यांचे नवे हिंदी गीत गुलशन कुमार प्रस्तुत टी-सिरीज कंपनी मुंबई ने नुकतेच रिलीज केले आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावरील एकमेव हिंदी गीत टी सिरीज ने रिलीज केले आहे.
'अहिल्यामाता का नाम हुआ है सारे हिंदुस्तान मे' असे हे गीत आहे. राजमातेच्या कार्यावर ओझरता प्रकाश टाकणारं हे सदरील गीत आहे. टी सिरीज ने रिलीज केल्यामुळे हे गीत चक्क भारतातील रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळत आहे.

या गीताचे गायक गोपाळ म्हेञे आळंदीकर, नांदेड, संगीतकार युवा कवी, गीतकार आणि गायक प्रा.संदीप भुरे आदमपूरकर, नांदेड, ध्वनिमुद्रक प्रकाश माने सोलापूरकर, मुंबई हे आहेत.
तर कोरस म्हणून सौ. मंजुळाबाई हायस्कूल खतगांव येथील चिमुकल्या मुलींनी दिले आहे.

याआधी गीतकार जाफर आदमपूरकर यांची चार मराठी गाणी ऑरेंज म्युझिक प्रस्तुत मुंबई ने रिलीज केलेली आहेत.
त्यात जेजुरी कुलदैवत श्री खंडोबा वरील भक्तिगीत 'बोला मल्हारी मार्तंड जय मल्हार' , शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'सार्‍या जगात पावन झाली शिवरायाची जयंती आली', हे शिवगीत, हजरत सैलानी बाबा यांच्या संदल निमित्ताने 'या सैलानी, हक सैलानी', 'बाबा सैलानी आमचा वली' , राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त 'अहिल्यामातेची जयंती आली' ही मराठी गाणी रिलीज झाली आहेत.

टी सिरीज ने 'अहिल्यामाता का नाम हुआ है सारे हिंदुस्तान मे' हे गीत रिलीज केल्यामुळे कवी, गीतकार जाफर आदमपूरकर यांचे प्रा. संदीप भुरे आदमपूरकर, प्रकाश माने, गोपाळ मेहञे, राधाजी कवठकर, बालाजी पेटेकर, शेख शादूल्ला, शितल कुमार माने, तानसेन, सिद्धार्थ गजघाटे, खलील कोल्हापूरकर, संजय टिपुगडे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


 •जाफर आदमपूरकर, नांदेड.
● भ्रमणभाष-९०६७४५११८९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...