बिलोली :बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा कवी, गीतकार जाफर आदमपूरकर यांच्या दोन गीतांना युट्यूब वरती तब्बल एक लाख व्हिऊज मिळाले आहेत.
ऑरेंज म्युझिक प्रस्तुत मुंबई 'बाबा सैलानी आमचा वली, आणि 'या सैलानी हक् सैलानी ने सजला हा दरबार' या हजरत बाबा सैलानी यांच्या जीवनावर असणारी ही मराठी कव्वाली साजातील गीते युट्यूब वरती तब्बल एक लाख रसिक श्रोत्यांनाी श्रवणाचा हा आनंद घेतला आहे. आपल्या केलेल्या कामाची रसिकांनी दिलेली ही उत्स्फूर्त दाद आहे.गीतकार म्हणून आतापर्यंत सहा गाणी लिहिली आहेत. ऑरेंज म्युझिक मुंबई निर्मित पाच गाणी आणि टी-सिरीज म्युझिक प्रस्तुत मुंबई साठी एक गाणं लिहिलेलं आहे.
वरील दोन्ही सुपरहिट गाण्यांचे युवा गायक, संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर हे आहेत. या आधी त्यांनी सुपरहिट गाणी रसिकांना दिली आहेत. गाण्यांचे सुप्रसिद्ध साऊंड इंजिनिअर प्रकाश माने, मुंबई, संगीत संयोजन शेख नयूम नांदेडकर हे आहेत.
याबद्दल गीतकार जाफर आदमपूरकर यांचे संगीतकार प्रा.संदीप भुरे, प्रकाश माने, शितलकुमार माने, पीएसआय मुरारी गायकवाड, साहित्यिक प्रा. डाॅ.जगदीश कदम, देवीदास फुलारी, कविवर्य मनोज बोरगांवकर, चिञकार बालाजी पेटेकर, कविवर्य अमृत तेलंग, संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड, लेखक
डाॅ.शाम पाटील तेलंग, समीक्षक ॠषिकेश देशमुख, संपादक दत्ता डांगे,कथा,पटकथा लेखक खलील पटेल कोल्हापूरकर, चिञपट दिग्दर्शक, निर्माता, गीतकार संजय टिपुगडे (कोल्हापूर),कविवर्य सुनिल पाटील(कोल्हापूर)इत्यादी मान्यवर मिञांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा