नांदेड (प्रतिनिधी)
अक्षारोदय साहित्य मंडळ नांदेड, कविकट्टा समूह,आणि मूकनायक वाचनालय मांजरम यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा युवा जीवन गौरव पुरस्कार पाच फेब्रुवारीला जाहीर झाला.अशी माहिती संयोजक जीवन मांजरमकर यांनी दिली होती,याच पुरस्काराचे वितरण एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिनी मांजरम येथे नायगावचे पी.आय.पडवळकर,अक्षोरोदय साहीत्य मंडळचे सदानंद सपकाळे, कविकट्टा समूहाचे अशोक कुबडे,मूकनायक वाचनालयचे जीवन मांजरमकर यांच्या हस्ते पत्रकार बबलू शेख बारुळकर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती कत्तेताई,भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष वली शेख,रयत संघटना प्रदेशअध्यक्ष पांडुरंग शिंदे,नारायण सावकार कुंभारे,मिर्झा जमीर बेग,शंकरराव जाधव,शिरू पाटील गायकवाड, डी.के.वाघमारे,दिगंबर वाघमारे,माधव भालेराव,डॉ.माधव कुद्रे,सौ.रुचिता बेटकर, संध्याताई रायठक,श्रीपत शिंदे मांजरमकर ,इब्राहिम शेख ,ओम ठाकूर,युनूस शेख,यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा