कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते आशा प्रेरणादायी विचारावर चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे कै. मारोतराव आनंदराव डांगे होते. त्यांनी खूप लहान वयात खूप मोठी यशाची उत्सुग भरारी घेतली होती.
त्यांनी कंधार लोहा तालुक्यातील राजकीय परस्थितीवर वेळोवेळी सडेतोड लिखाण करून संबंध राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून स्व. मारोतराव डांगे परिचित होते त्यांच्या चौफेर लिखाणामुळे ते सदैव आठवणीत राहतील त्यांचे लिखाण राजकीय परस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याबरोबरच समाजाला दिशा देणारे होते.
शिराढोण सह खेडेगावातील अनेक शेतकरी येऊन त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडायचे; त्यांनी त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. शासकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन ते ठामपणे जाब विचारायचे. लोकशाहीमध्ये जनता ही मालक असते; त्यांची शासकीय अधिकाऱ्यांनी अडवणूक करू नये, अशी त्यांची अपेक्षा असायची. कोणावर अन्याय झाल्यास ते पुढाकार घ्यायचे. अन्यायाविरुद्ध त्यांनी कधीही तडजोड केली नाही. शासनाच्या भ्रष्ट यंत्रणेने कोणाला त्रास दिल्यास ते त्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवित. त्यांच्या प्रत्येक कृतीतून-लिखाणातून सर्वसामान्यांची बाजू ठामपणे मांडली जायची.कंधार लोहा तालुक्यातील प्रत्येक गाव आदर्श व्हावे व पुढे जावं असा त्यांचा ध्यास होता त्यामुळे ते कधी लिखाणातून तर कधी प्रत्येक्ष भेटीतून हे मुद्दे ते पुढे घेऊन जात होते. साहित्य, कला, संस्कृती व शेतीवर त्यांना प्रचंड प्रेम होते त्यांच्या सहवासात मी याच विषयावर मी त्यांच्याशी चर्चा करत त्यांना राजकारणाचा सखोल अभ्यास असल्यामुळे अनेक राजकीय नेते त्यांचे मत ऐकून घेत तसेंच त्यांनी लिहिलेल्या लिखाणातून अनेक राजकीय नेत्यांची झोप देखील उडालेली मी पाहिली होती. स्व. मारोतराव डांगे यांनी बऱ्याच पत्रकार संघटनेशी एकरूप होऊन कामे केली मने जिंकली त्यात नांदेड जिल्हा मराठी पत्रकारसंघाचे सदस्य, कंधार तालुका मराठी पत्रकार संघांचे उपाध्यक्ष, उस्माननगर मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी जिल्हा परिषेद शाळा शिराढोण चे उपाध्यक्ष म्हणून काम पहिले होते तर सामाजिक क्षेत्रात शिराढोण तंटामुक्ती उपाध्यक्ष म्हणून काम करून अश्या अनेक पदांचा अनुभव त्यांनी घेतला होता ते या क्षेत्रात काम कारतेवेळेस त्यांना समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते संपूर्ण आयुष्य त्यांनी पत्रकारितेत घालविले स्व. मारोतराव डांगे स्वभावाने शांत, सरळ व मितभाषी होते पत्रकारितेत संयमी आणि आक्रमक असे दोन प्रकार दिसून येतात त्यामध्ये मारोती डांगे हे सौम्य आणि संयमी होते पण ठोस अशीच होती. त्यांच्या लिखाणाचे चाहते कंधार लोहा परिसरात मोठ्या प्रमाणावर होते पत्रकारित धडपडणाऱ्या सर्वांसाठीच मग तो नवखा पत्रकार असो कि अनुभवी, माध्यमांच्या सध्याच्या युगात हा गुण अत्यंत दुर्मिळ झाला आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याजवळ असलेले विचारधन पत्रकारितेत धडे गिरवणाऱ्या अनेकांना मुक्तहस्ते देणारा स्व. मारोतराव डांगे यांच्या सारखा पत्रकार विरळच. स्व. मारोतराव डांगे यांचा जन्म 7मार्च 1974रोजी एका गरीब कुटुंबात कंधार तालुक्यातील शिराढोण येथे झाला होता त्यांचे वयवर्षे 3 असते वेळेस अचानक त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले त्यांनतर स्व. मारोतराव डांगे यांच्या सोबत त्यांची आई निलाबाई डांगे, मोठी बहीण शिवानंद मंगनाळे आणि छोटी बहीण महानंदा सोनटक्के असा त्यांचा परिवार होता त्यांच्या सहवासात 9वी पर्यंत चे शिक्षण भीमाशंकर विद्यालय शिराढोण या शाळेतून झाले तर 10ते 12वी पर्यंत चे शिक्षण शिवाजी हायस्कुल कंधार येथे पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी ग्रामीण भागातून दै.लोकाशा, दै. एकजूट, दै आनंदनगरी, दै देशोन्नती अश्या वर्त्तपत्रात काम करून समाजाचे प्रश्न मार्गी लावले असा अभ्यासू वर्तीचा पत्रकार काळाच्या पडद्या आड गेला असला तरी त्यांच्या लिखाणातून ते कायम आठवणीत व सर्वांनाच प्रेरणादायी व मार्गदर्शक असतील.
(लेखक :-वीरभद्र येजगे)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा