शिराढोण (शुभम डांगे)
कंधार तालुक्यातील शिराढोण येथे समृद्धी सुकन्या योजनेचा मोठया थाटात शुभारंभ करण्यात आला शिराढोण येथील डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजनेत गावातील 1 जानेवारी ते 31डिसेंबर 2019 या कालावधीत जन्मलेल्या 0ते 1वर्ष वयोगटातील सर्व मुलींचा पहिला हप्ता शिराढोणचे उपसरपंच तथा भिमाशंकर विध्यालयचे प्राचार्य खुशाल पाटील पांडागळे यांनी भरण्याचे माणस व्यक्त केले आहे त्याच बरोबर मी आपल्या शिराढोण गावाच्या कामासाठी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो असे पांडागळे म्हणाले.
खुशाल पाटील पांडागळे यांनी गोरगरीब जनतेच्या मुलींना भविष्यात याचा चांगला लाभ घेता यावा पालक वर्गाना भविष्यात मुलींचे लग्न ओझं वाटू नये गोरगरीब जनतेला बचतीचे महत्व कळावे व याच पैशातून भविष्यत एक चांगले काम व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविल्याचे समजले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा