शिराढोण ( शुभम डांगे)
उस्माननगर -शिराढोण दरम्यान चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामुळे या मार्गालगत असणाऱ्या शेती असणाºया शेतकºयांच्या शेतातील उभ्या पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने या धुळीने काळवंडत आहे. पावसाळ्याच्या काळात या महामार्गाच्या कामाने परिसरातील उस्माननगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याची ओरड ऐकायला मिळाली होती. सुरुवातीच्या काळापासून ढिसाळ नियोजनामुळे या महामार्गाचे काम शेतकऱ्यांना मारक ठरले आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार /लोहा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३61 (ए) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे. यापैकी उस्माननगर -शिराढोण हा मार्ग संबधित कंत्राट कंपनीने पूर्णत: खोदला आहे. या मार्गाचे कासवगतीने चौपदरीकरण सुरु आहे. वाहतुकीकरिता या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावरून मोठया प्रमाणात भरघाव वेगाने जडवाहनांची वाहतूक होत आहे. संबधित कंत्राट कंपनी या मार्गावर नाममात्र पाणी मारण्याचा देखावा करीत असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी या मार्गावरील उडणारी धूळ लगतच्या शेतातील पिकांवर बसत आहे. या मार्गालगतचे बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक असल्याने ही धूळ शेतातील पांढऱ्या सोन्यावर बसत आहे. यामुळे शेतकऱ्यासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्याच्या काळात उस्माननगर परिसरातील महामागार्लागतच्या शेतकऱ्याच्या शेतात कंपनीच्या चुकीमुळे उभ्या पिकात मोठया प्रमाणात पाणी साचले होते. याचा फटका शेतकºयांना बसला असून त्यांचे पीक पूर्णत: नष्ट झाले. आता तर मार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या कापूस पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने उडणारी धूळ बसत आहे. प्रत खराब झालेल्या कापसाला अपेक्षित भाव मिळणार नसल्याने शेतकरी संतापले आहेत.
कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षाने महामार्गालगतच्या अनेक पिकावर धूळ बसली आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून प्रसासनाने या नुकसानीचा तातडीने सर्व्ह करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा