नांदेड- अखिल भारतीय अंतर सांस्कृतिक संघ नागपुरच्या वतीने आयोजित अखिल भारतीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धा व महोत्सव या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कु. देवश्री दमकोंडवार हिने भारतीय लोक कला या प्रकारात "गोंधळ" हे नृत्य सादर केले. या प्रकारात तिला प्रथम पुरस्कार मिळाला. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की कु. देवश्री राजेश दमकोंडवार हीचे वय सात वर्ष असुन ती रा. रावी ता.मुखेड जि.नांदेड येथील असुन ती अखिल भारातीय अंतर सांस्कृतिक संघ नागपूर या सांस्कृतिक संस्थेकडुन आयोजीत अखिल भारतीय राष्ट्रीय नृत्य व महोत्सव स्पर्धा आयोजित नागपुर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण भारतातुन स्पर्धक सहभागी झालेले होते. नांदेड जिल्ह्यातुन व मराठवाडा विभागातुन कु.देवश्री राजेश दमकोंडवार हीने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत भारतीय लोककला या प्रकारात तीने महाराष्ट्राची लोककला गोंधळ हे नृत्य सादर केले होते. कु.देवश्रीच्या गोंधळ नृत्याला संपुर्ण देशातुन प्रथम क्रमांक मिळाला. देवश्री ही कुंटुर व घुंगराळा ता.नायगाव चे ग्रामविकास अधिकारी राजेश दमकोंडवार यांची मुलगी तर महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना नांदेडचे जिल्हाध्यक्ष नागनाथ दमकोंडवार यांची पुतणी आहे. कु.देवश्रीच्याया यशा बद्दल भाजपाचे जिल्हा परीषदेचे गट नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वसंत सुगावे ,जिल्हा परीषद चे मा.सभापती राजेश देशमुख कुटुंरकर, सत्यजीत टिप्रेसवार जिल्हाध्यक्ष हिवताप कर्मचारी संघटना नांदेड यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा