०३ फेब्रुवारी २०२०

शंकरनगर येथील बालिकेवरील आत्याचार प्रकरणी सगरोळी फाट्यावर (येसगी) रास्ता रोको



बिलोली ता.प्र  बिलोली तालुक्यातील शंकरनगरच्या साईबाबा प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सातव्या वर्गात शिकत असलेल्या आल्पवयीन विद्यार्थीनीवर केलेल्या लैंगिक आत्याचाराचे सगरोळी परिसरातही  तिव्र पडसाद उमटले.दि.०३ फेब्रुवारी रोजी परिसरातील लोकस्वराज्य आंदोलन व तमाम समाज बांधवासह कांही राजकीय पक्ष व संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते एकञ येऊन रास्ता रोको केला लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे, कामगार अध्यक्ष रावसाहेब पवार, भारिपचे तालुकाध्यक्ष धम्मदिप गावंडे ,गंगाधर भंडारे यांच्या उपस्थितीत रितसर व शांततामय मार्गाने रास्ता रोको करण्यात  आले.
यामध्ये सगरोळी फाट्यावरील (येसगी )  सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तपणे आपआपली दुकाने कांही वेळ बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध केला.
या घटनेचे शासन व प्रशासन तातडीने गांभीर्य ओळखून १)मोकाट आरोपींला तात्काळ अटक करण्यात यावे व चारही आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. २) हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा ३) खटला प्रसिध्द कायदे तज्ञा मार्फत चालविण्यात यावा ४) पिडित मुलीच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे ५) कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नौकरीत सामावून घेण्यात यावे ६) साईबाबा शिक्षण संस्थेची माण्यता रद्द करण्यात यावी ७) पिडीत मुलिच्या कुटुंबास संरक्षण देण्यात यावे या मागण्यासह अन्य कांही मागण्याचे निवेदन महसुल प्रशासनासह सहाय्यक पोनि.केन्द्रे यांना शिष्टमंळाने देऊन आमच्या भावना शासनापर्यंत पोंहचविण्याची विनंती केली.या निवेदनावर प्रामुख्याने गंगाधर भंडारे,गंगाधर सिंदलोन,मुकिंदर कुडके,यादव प्रचंड,संतोष प्रचंड,शिवराज सुर्यकर,सचिन वाघमारे,चद्रकांत कुडके,पवन सुर्यकर,बालाजी प्रचंड,संतोष गायकवाड ,प्रेम प्रचंड,संजय सिंदलोन   यांच्यासह बहुसंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. यासाठी अगदी सकाळ पासून तालुक्यातुन मोठ्या संख्येने नागरीक  येसगी फाट्यावर  दाखल होऊन घोषणाबाजी करीत कांही काळ वहातुक बंद करून  प्रशासकीय यंत्रणेसह प्रवाशांचे लक्ष वेधुन घेतले.या रास्ता रोकोसाठी बिलोलीचे पोनि.शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोनि.माणिक केंद्रे,पोकाॕ.बोधने,वाघमारे,बादेवाड,निमलवाड,सोनकांबळे,पाटिल,शिन्दे,वाडेकर आदींनी चोख बंदोबस्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...