मुदखेड - दि ०१ फेब्रुवारी २०२० रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मुदखेड च्या वतीने तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या सहभागाने आशा दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पंचायत समिती मुदखेड येथील सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम गटविकास अधिकारी श्री एम बी जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी श्री जाधव यांनी गावपातळीवरील आरोग्य व्यवस्थेमध्ये आशांची महत्वाची भुमिका आहे व तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असल्याचे गौरवोद्गार काढले.
श्री गजभारे यांनी गरोदर मातांच्या एच आय व्ही तपासणीचे महत्त्व, श्री मुरकुटवार यांनी कुष्ठरोग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती भालेराव आरोग्य सहाय्यीका यांनी उपकेंद्र व ग्रामपातळीवर आशा स्वयंसेविकांनी करावयाची कामे याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यांनतर आशांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने रांगोळी, निबंध व गायन स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना तसेच कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री सतिश रत्नपारखी आशा समन्वयक, श्रीमती पाटील, श्री हंबर्डे, श्री काटकर, श्री पंडीत, श्री कोलते,अमोल यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा