शैक्षणिक वारसा नसताना, प्रतिकूल परिस्थिती असताना, संकटांना भेदून, अडचणींवर मात करण्यासाठी संघर्ष केला. संघर्षाशिवाय यश दृष्टिपथात येत नाही. याची खुणगाठ मनात बांधत पत्रकारितेत आपले स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण यशस्वी अस्तित्व निर्माण करणारे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे युवा पत्रकार राजेश्वर कांबळे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्यांंना शैक्षणिक व्दार खुले करणारे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, साहित्य कोहिनुर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महापुरूषांचे विचार व आदर्श डोळ्यासमोर ठेवत सामाजिक बांधिलकीने पत्रकारिता करत असतात. कल्पनेचे पंख लावून भरारी घेत नाहीत. सामाजिक प्रश्रांच्या मुळाशी जाऊन वास्तव चित्र मांडतात. आणि त्यावर उपाय सुचवितात. हे करत असताना कोणाचा मुलाहिजा ठेवत नाहीत.
राजेश्वर कांबळे यांचे आई-वडील निरक्षर असले, तरी आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन समाजसेवेत अग्रेसर राहिली पाहिजेत. यासाठी त्यांनी मोठ्या हाल अपेष्ठा सहन करत राजेश्वर यांना घडवले. लहानपणी राजेश्वर यांनी आपली आर्थिक परिस्थिती जवळून अनुभवली. त्यांनी कुटुंबाला मदतीचा हात दिला. घरोघर पेपर वितरणाचे काम केले. अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर शिक्षण पूर्ण केले. वाचन, कष्ट, प्रयत्न, इच्छाशक्ती, आत्मविश्वास याचा सुरेख समन्वय साधत त्यांनी एम.ए, बी.एड्, बी.जे व एम.जे या उच्च पदव्या संंपादित केल्या. आणि याचा वापर पत्ररकारितेत केला. अठराव्या वर्षी पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केलेला हा उमदा तरुण पत्रकार नावारूपाला आला. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन’, ‘संविधान दिन’ साजरा करत समाजाचे व विद्यार्थ्यांचे त्यांनी लक्ष वेेधले.
पत्रकारिता हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. सामाजिक समस्येचे आकलन करून ते शब्दबद्ध करणे कठीण आहे. वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी शब्दांंचा साठा असावा लागतो. शब्द सामर्थ्यातून बातमी समाज मनावर बिंबावी लागते. आणि समाजात बिंबली तरच समाज कौतूकाची थाप मारत असतो. राजेश्वर अशा कौतुकाचा धनी झालेला पत्रकार आहे. कौतूकाने कधी हुरळून गेला नाही. आणि कोणी डिवचले, तरी विचलित झाला नाही. सामाजिक समस्या त्यांनी मांडत असताना राजकीय पुढारी, अधिकारी, कर्मचारी यांचा रोष अनेकदा पत्करला.
सामाजिक प्रश्रांची उकल करण्यासाठी जसा राजेश्वर यांचा प्रयत्न असतो. तसाच विविध उपक्रमात सहभाग असतो. मतदान जनजागृती सोबत मतदार जनजागृती सारखे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचे अविरतपणे कार्य आहे. मतदान नोंदणी, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पत्रकारिता उपयोगात आणली. राजकारण सतत अनिश्वततेचा खेळ असला, तरी पुढारी आपली राजकीय भूमिका निवडणूक प्रचार सभेतून मांडत असतात. आणि सत्ता संपादन करत असतात. प्रचार सभेतील भाषणातून समाजाच्या विकासाचे प्रश्र सोडविण्याचे आश्वासन देत असतात. त्यातील वास्तवात उतरणाऱ्या घोषणावर नेमके बोट ठेवत वृत्त संकलन करत ते प्रसिद्ध करण्याचे कौशल्य राजेश्वर कांबळे यांच्याकडे आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी व राजकीय विषय हाताळताना जसे ते संवेदनशील असतात. तसेच कठोर होतात. मृदू, शांत वाटणारा राजेश्वर व्यवस्थेवर आसूड ओढतात.
शेतकऱ्यांची निसर्ग सकंटाने होणारी घालमेल यावर राजेश्वर कांबळे यांनी प्रकाश टाकत लेखाजोखा मांडला. २०१४ मध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा. २०१५ मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा दुष्काळ पाहणी दौरा, तर २०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा दुष्काळ व अतिवृष्टी पाहणी दौऱ्यांचे उत्कृष्ट वृत्त संकलन केले. आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई आंबेडकर, दिल्लीच्या जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आदींसह अनेक पुढाऱ्यांच्या सभेचे वृत्त संकलन विविध पैलूनी केले.
लोहा विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये झाली. आपल्या खास वार्ताकंनाने खऱ्या अर्थाने गाजविली. विविध ठळक मंथळ्याखाली २० पेक्षा अधिक बातम्या प्रकाशित करुन संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले. अनेक बातम्यांची प्रशासनाने दखल घेतली व पीपीटी मध्ये त्यांच्या बातम्यांना अग्रगण्यस्थान दिले गेले.
माणसं जोडत असताना सामाजिक ऐक्यावर भर देणारी पत्रकारिता ते जतन करत असतात. तसेच पक्षांशी मैत्री करत 'पक्षीमित्र' अशी ओळख निर्माण केली. ऐतिहासिक जगतुंग समुद्र व मन्याड नदीवरील 'फ्लेमिंगो' या विदेशी पक्ष्यांचे निरीक्षण बारकाईने केले. आणि या पक्ष्यांचा अभ्यास केला. नानाविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांना 'नेहरू आंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार, पत्रकाररत्न, पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कंधार नगर परिषदेने केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षणसाठी ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून त्यांची नियुक्ती केली.
पत्रकार राजेश्वर कांबळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व निरोगी दिर्घायुष्य लेखनीच्या माध्यमातून समाज सेवा करण्यासाठी लाभो. ही मंगलमय कामना !
- प्रा.डॉ.गंगाधर तोगरे, कंधार
मो. ९४२३६५६३४५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा