रयत क्रांतीचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांचा आरोप
कायमचा दुष्काळाचा सामना करणारा अशी ओळख निर्माण होत असलेला मराठवाड्यात नवंसंजवनी देणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेस या महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली म्हणजे मराठवाड्यात जनतेचा सुड उगवणे होय असा संतापजनक आरोप रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी मागच्या सरकारच्या काळातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आकारास येत असलेली योजना फक्त राजकीय आकसापोटी महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली आहे.एकीकडे योजनेच्या तीन ते चार निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या होते व शासकीय संस्था असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने काम सुध्दा सुरु केले होते पण काही तरी कारण देऊन थांबवण्याचे काम हे सरकार करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की,मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची स्थगिती उडवावी व आमच्या भागांतील शेतीला व पिण्यासाठी पाणी आणणारी योजना पूर्णत्यास न्यावी कारण आपण सुध्दा योजना मंजूर करते वेळेस राज्यसरकार मध्ये होतात व आमच्या वर होणार अन्याय थांबवावा अन्यथा मराठवाड्यातील जनता रस्त्यावर येऊन विरोध करील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या कडून आम्ही मराठवाड्यात जनता काय अपेक्षा करणार कारण पवारांचा (जाणता राजा)इतिहास पहिला तर नेहमीच मराठवाड्याला दुजाभाव करून या भागांचा निधी,योजना,प्रकल्प आपल्या भागाकडे नेले आहेत व मराठवाडा कसा मागास राहील याची व्यवस्था केली आहे,पाणी पळवन्यात ते माहीर आहेत उपरोक्त टोला शिंदे यांनी मारला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा