०२ फेब्रुवारी २०२०

नांदेडला कृषि महाविद्यालय स्थापन करण्याची पालकमंत्र्यांकडे केदार साळुंकेची मागणी


नांदेड(प्रतिनिधी):वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्यास मान्यता घेऊन नांदेड येथे कृषी महाविद्यालय स्थापन करावे अशी मागणी कृषी विद्यापीठ माजी कार्यकारी परिषद सदस्य केदार पाटील साळुंके यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना अशोकरावजी चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.
      नांदेड जिल्ह्यात अद्याप शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आलेले नसून मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेड व औरंगाबाद जिल्हा वगळता बाकी सर्वच जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालयाची  स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सन 2010 मध्ये कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेने मान्यतेसाठी शासनाकडे पाठवलेला आहे. तो प्रस्ताव मागील दहा वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्या प्रस्तावास मान्यता घेऊन नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची  सोय नांदेड येथे उपलब्ध करून देण्याची मागणी नुकतीच मुंबई येथे  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य केदार पाटील साळुंके यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...