नायगाव महाराष्ट्र शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली. सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्याचे निवेदन पाठवयात आले आहे.
या निवेदनात असे सांगितले आहे ,
आमच्या नायगाव तालुक्यात गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पावसामुळे शेतीच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही, दुसरीकडे गेल्या वर्षी आणि यावर्षी दोन्ही हंगामातील पिकाचे नुकसान झाले हे सरकारी आकडेवारीवरून सिद्ध होते त्यामुळे सन २०१८-१९ व २०१९-२० या हंगामातील पीक विमा लागू करण्यात यावा ,तालुक्यातील शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करत आहोत.
पुढील मागण्या करण्यात आले आहे,
१)शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
२) सन २०१८- १९ व २०१९-२० या खरीब- रबी हंगामातील पीक विमा लागू करावा.
३) अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत वाटप करावे.
४) शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यात यावे.
५) सोमठाणा गावातील पाझर तलावाचा मावेजा तात्काळ देण्यात यावा.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, तालुका अध्यक्ष शहाजी कदम,शिवाजी गायकवाड, युवा तालुका अध्यक्ष साहेबराव चट्टे, व्यंकट शिंदे,विश्वनाथ शिंदे व अनेक शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा