बिलोली खेळण्या बागडण्याच्या वयात छञपती शिवाजी राजेनी हिंदवी स्वराज्याची मुर्तवेढ रोवली. राजमाता माँ जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकञ करून एक एक किल्ला सर करून स्वराज्य निर्माण केले.आपल्या माता पित्याच्या आज्ञेत राहून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छञपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत आपल्या माता पित्याच्या आज्ञेचे पालन करणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांनी केले.ते दि.२३ फेब्रुवारी रोजी बिलोली तालुक्यातील शिंपाळा येथे शिव जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद सदस्य प्र.गणेश पा.मरखले,नांदेडचे उद्योजक एम.ए शाहेद सेठ,जेष्ठ शिक्षक बालाजी गेंदेवाड, पञकार राजु पाटील शिंदे,सरपंच बापुराव पा.शिंदे ,केदार पा.शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यात आले.तद्दनंतर येथिल कु. भोसले संगिता,भाग्यश्री नरवाडे ,श्रिनिवास शिंदे या शाळकरी बालकांनी माँ.जिजाऊ व छञपती शिवाजी महाराजांवर अंगावर शहरे येण्यासारखे विचार मांडले. तर जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांनी आपल्या सखोल अशा मार्गदर्शनात माञभक्त,स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचे विचार मांडले.यावेळी गावातील महिला,पुरूष युवकांसह सर्व जाती धर्मातील शेकडो नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सार्वजनिक शिवजयंती मोहत्सहव समिती च्या वतिने दिलीप शिंदे ,गजानन शिंदे ,श्रिनिवास शिंदे ,गंगाधर म्याकलोड,बालाजी कराडे ,राजेंद्र शिंदे,शिवराज शिंदे ,दत्ता मुंगडे ,यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा