०२ मार्च २०२०

टपाल विमा धारकाच्या पत्नीला डाक विभागाची तात्काळ मदत


नांदेड. दि.२ मार्च येथील केंद्रीय विध्यालयातील कर्मचारी बाळाजी विश्वावनाथ शिंदे शिक्षक यांनी दिनांक १० एप्रिल २०१९ रोजी आठ लाखाचा टपाल डाक जीवन विमा (PLI) काढला होता.त्यांनी फक्त पाच महिने रुपये २८४०/ प्रतिमहिना भरणा केला होता.
 परंतु दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे वारस श्रीमती पूजा बालाजी शिंदे यांना नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांच्या हस्ते रुपये ८,४६,४००/अक्षरी आठ लाख,छेचाळीस हजार, चारशे रुपयांचा धनादेश तात्काळ देण्यात आला.
यावेळी साहयक डाक अधीक्षक डॉ. भगवान नागरगोजे, साहयक डाक अधीक्षक संजय आंबेकर, नांदेडचे पोस्ट मास्तर डी. एम. जाधव, डाक विभागाचे विपणन आधिकारी सुरेश सिंगेवार, डाक जीवन विमा (PLI ) विभागाचे ग्यानदास आसोले,महेश गायकवाड, शेख अहेमद, डाक कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...