पीक विमा अंतर्गत जाहीर झालेली तुटपुंजी रक्कम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे - पांडुरंग शिंदे
शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जाहीर झालेली तुटपुंजी रक्कम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी टीका केली आहे
पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ अंतर्गत नायगाव तालुक्यात मंजूर झाला म्हणून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद तयार झाला होता पण जेव्हा खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले त्या आनंदावर निरसन तयार झाले कारण पीक विमा हा कमी प्रमाणात लागू झाला रक्कम ही खूपच कमी रक्कम आली आहे, हंगामातील पिक जेव्हा कापणीला आले तेव्हा अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, चांगल शिवारात पीक आलेलं उभ्या डोळ्यादेखत या अस्मानी संकटामुळे वाया गेलं शेतकऱ्यांना भरलेला पीक विमा हा आम्हाला मिळेल ह्या आशेवर शेतकरी पिक विमा कंपनीच्या व राज्य सरकारच्या घोषणे कडे लक्ष देऊन होता घोषणा झाली पण खोदा पहाड निकला चुवा अशी गत पिक विमा रकमेची झाली आहे असे शिंदे म्हणाले
पिक विमा भरून घेत असताना आम्हाला सांगितलं गेलं ३३ टक्के पिकाचे जर नुकसान झालं विमा लागू होईल नायगाव तालुक्यात पिकाची नुकसान हे ५० टक्क्यांच्या वर झाले आहे हे सरकारी आकडेवारीवरून निदर्शनात येते.
पंतप्रधान पिक विमा योजनेच्या उद्दिष्टांमध्ये व जोखीम च्या बाबी स्पष्ट असे सांगितले आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे जर पिकाचे नुकसान झालं तर पीक विमा लागू होईल पण यावर्षी पीक विमा लागू झाला आहे तो जोखमीच्या फक्त १० टक्के लागू झाले म्हणजे जवळपास ५० टक्के नुकसान झालंय म्हटलं तरी हेक्टरी ३३,००० हजार रुपये मिळायला पाहिजे पण मिळाले किती ती हेक्टरी ४५०० रुपये म्हणजे एकरी १७०० ते १८००रुपये होतात. सोयाबीन पेरणी ते कापणी एकूण खर्च एकरी ६००० रुपये येतो. पीक विमा एकरी १७०० रुपये मिळाले म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ आली.
आमची राज्यशासनाला नम्र विनंती विमा हा जोखीम स्थराच्या ७० ते ८० टक्के लागू करावा व आम्हाला न्याय द्यावा ही आमची मागणी जर मान्य नाही झाली रयत क्रांती संघटना शेतकऱ्याला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल असा इशारा पांडुरंग शिंदे यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा