नायगाव शहरासह परिसरात तालुक्यातील लहान मोठ्या गावात प्रशासनाने कोरोना व्हायरल रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण करण्यासाठी तात्काळ सोडियम क्लोराइड स्प्रे च्या फवारण्या कराव्यात व परिसर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी. अशी मागणी प्रशासनाला भाजपा नेते तथा मा जि प सदस्य नायगाव चे श्री बालाजी गणेशराव बच्चेवार यांनी मा तहसीलदार नायगाव, व मा मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत नायगाव, मा आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय नायगाव यांच्याकडे केले आहे.
त्यानुसार मा. तहसीलदार नायगाव यांनी संबंधितांची तात्काळ बैठक घेऊन संपूर्ण नायगाव नरसी आदी परिसरात औषधाची उपलब्ध करून लगेचच फवारणी चे काम हाती घेतल्या जाईल असा निर्णय घेण्यात आला
निर्जंतुकीकरण फवारणी चे कार्य तात्काळ सुरू करण्यात येईल त्यामुळे व्हायरस रोखण्यासाठी ,जनतेच्या आरोग्यासाठी बालाजी बच्चेवार यांनी प्रशासनाला फवारणी करून आरोग्यदायी उपक्रम राबवण्यास शिफारस केल्यामुळे शासकीय स्तरावर तहसीलदार यांनी होकार दिल्यामुळे जनतेमध्ये या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केल्या जात आहे .जनतेच्या अनेक समस्यांमध्य,अडीअडचणी सोडवण्यात बालाजी बच्चेवार यांची नेहमीच भूमिका महत्त्वाची ठरत असते .निर्जंतुकीकरण फवारणीची प्रशासनाकडे केलेली एक मागणी हे त्याचाच भाग असून जनमानसात समाधान व्यक्त केल्या जात आहे◼◼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा