करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - भारत सोनकांबळे
मुखेड /प्रतिनिधी
सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या
महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला घरी राहण्याबाबत जनजागृती करत आहेत तसेच राज्य सरकार व जनता यांच्यातील मुख्य दुवा म्हूणन प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका बजावत आहेत करोना हा रोग जीवघेणा आहे असे माहित असून देखील जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रस्त्यावर फिरून तमाम पत्रकार आपली भूमिका बजावत आहेत.
केंद्र सरकार व राज्य सरकार ने डॉक्टर व वैद्यकिय क्षेत्रातील तसेच जनते साठी वेगवेगळ्या आर्थिक तरतुदी केल्या आहेत परंतु पत्रकारांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद अद्यापपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेली नाही.
आज राज्यातील पत्रकारांची अवस्था अत्यंत बिकट व सुमार असून त्यात अल्प मानधनावर काम कामकारणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांची संख्या खूप मोठी आहे तरीही समाज आणि देशहितासाठी पत्रकार खूप परिश्रम घेत आहेत कुठलेही आर्थिक पाठबळ नसतानाही पत्रकार आपली जबाबदारी पार पडतोय,
केंद्र सरकार व राज्य सरकार ने करोना च्या संकट समयी सर्व सामान्य जनतेला मोठया प्रमाणात आर्थिक सवलती जाहीर केल्या असून त्यात पत्रकारांचा अजिबात उल्लेख नाही, प्रत्येक वेळी पत्रकारावर असा अन्याय होतोय,त्यामुळे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ नावालाच उरला आहे काय असा सवाल प्रत्येकाच्या मनात येत असावा , सध्यस्थितीत देशातच नव्हे तर अख्या जगामध्ये कोरोना ची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रकारांना शासनाकडून सर्व बाजूने मदत मिळायला हवी, हीच काळाची गरज आहे असे मत प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा