पेटेकरांनी सादर केलेल्या कवितांनी विद्यार्थी मञंमुग्ध
बिलोलीयेथील जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गत काही वर्षापासून निमित्त वाढदिवसाचा अन् सन्मान कर्तत्वान व्यक्तीमत्वाचा हा कार्यक्रम आयोजित केला जातो.या वर्षीही दि.७ मार्च रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय क्षेञात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रसिध्द ग्रामीण कवी बालाजी पेटेकरांनी सादर केलेल्या कवितांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित मंञमुग्ध झाले होते.
सर्वसामान्यपणे वाढदिवस म्हणटला की मोठ मोठे होडीन्स,बँनर,आतिषबाजी,केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.या आधूनिक चाली रितींना छेद देत गेल्या ३० वर्षापासून वृत्तपञ क्षेञात काम करत लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी झगडणारे प्रसंगी विषारी औषध प्राशान करून दुर्लक्षीतांच्या अडचणी सोडविणारे जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांचा ७ मार्च रोजी वाढदिवस असतो.आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या मुंडकर यांच्या मिञ मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून निमित्त वाढदिवसाचा अन् सन्मान कर्तृत्वान व्यक्तीमत्वाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.गत वर्षी नगरपरिषद,पोस्ट आँफीस,एस.टी महामंडळ,विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला होता.तर या वर्षी ७ मार्च रोजी शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय क्षेञात उत्कृष्ट कार्य करणारे बिलोली ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार,व कुंडलवाडीच्या आरोग्य केंद्रांचे डाँ.सातमवाड यांच्या सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर पा.सावळीकर यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना पञकार गोविंद मुंडकर यांनी सन्मान मुर्ती दोन्ही अधिकाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाळेल जिवनात येणारे अडथळे पार करत मोठ्या पदावर काम करून समाजसेवा केल्या मला खर्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील असे मत व्यक्त केले.तर सत्कारमुर्ती नागेश लखमावार यांनी आपल्या शालेय जिवनापासून आलेल्या अडचणी व त्यातुन इच्छाशक्तीच्या जोरावर केलेली मात यावर विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून आदर्श व्यक्तीना डोळ्यासमोर ठेवल्यास यश नक्कीच प्राप्त होते असे मत व्यक्त केले.मन्यवरांच्या सत्कार व मनोगताच्या कार्यक्रमानंतर प्रसिध्द ग्रामीण कवी बालाजी पेटेकर यांनी शिक्षण,मोबाईल,शेतकरी यादी विषयावर सादर केलेल्या कवितांनी शाळेतील विद्यार्थ्यांसह उपस्थीतांना मंञमुग्ध केले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणून दोन्ही सन्मान मुर्तीचा शाळेतीलच विद्यार्थीनिंच्या हस्ते ग्रथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी केंद्र प्रमुख शंकर हंमद,पञकार राजू पा.शिंदे,शेख फारूख अहेमद,कुंडलवाडीचे अफजल भाई,सय्यद रियाज,पोषण आहार प्रमुख सलिम शेख,हिंगोलीचे ग्राम विस्तार अधिकारी गंगाधर हालबुर्गे यांच्या सह शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजक तथा जेष्ठ शिक्षक बालाजी गेंदेवाड यांनी प्रास्तविक करतात कार्यक्रम आयोजित करण्याच्या उद्देशासह सन्मान मुर्तींच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.महिला दिनाच्या पुर्वसंधेचे औचित्य साधून शाळेतील सर्व महिला शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान व शाळेतील पाच विद्यार्थीनिंचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा