बिलोली - ०८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त बिलोली नगर परिषद शाळेत बिलोली न.प.चे नगरसेवक जावेद कुरेशी तर्फे सर्व शालेय मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, जागतिक महिला दिन निमित्त बिलोली नगर परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली .यावेळी बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक मा.कैलास कणसे व समतादूत प्रकल्पाच्या मुख्य संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सौ.सुजाता पोहरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
यावेळी बिलोली न.प.चे नगरसेवक प्रतिनिधी अमजद चाऊस उपस्थित होते .व सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सहशिक्षिका सौ.नसीम बानू ,सौ.नजमा फातेमा व सहशिक्षक जाधव एस.एस.,जाधव पी.जी.यांनी परिश्रम घेतले शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.अजिझा बेगम यांनी आभार मानले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा