सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करून पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे - पांडुरंग शिंदे यांची मागणी
शेतीचा खरीब हंगाम सुरू होण्यास एक महिना अवधी आहे, सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज व सरसकट पुनर्गठित पीक कर्ज व बी-बियाणे ,खते मोफत उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.
कोरोना या महामारी मुळे जगामध्ये थैमान घातले आहे,मानव जातीवर हे मोठे संकट निर्माण झाले आहे, या महामारी चा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे .
लाखो रुपये खर्च करून तयार केलेला भाजीपाला असेल फळ पिके असतील लॉक डाऊनस असल्यामुळे विक्री होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात फळे व भाजीपाल्याची विक्री कराव लागत आहे. काही शेतकऱ्यांना अक्षरशा आपल्या बागा कुर्हाडीने तोडून टाकल्या तर काही ठिकाणी नांगरटी करून मोडून काढल्या आहेत.
शेतकऱ्याला नेहमी आसमानी व सुलतानी संकटाने घेरलेलेच असतेच पण यावर्षी सुपर इंडियातल्या लोकांनी आणलेल्या कोरोना व्हायरस मुळे त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचे हे भूत आमच्या मानगुटीवर बसवण्याचं काम सुपर इंडिया वाल्यांनी केलेला आहे. आणि सरकार सुद्धा आता फक्त कोरना ही एकमेव समस्या असल्यासारखं काम करत आहे,असा आरोप पांडुरंग शिंदे यांनी केला आहे.
जगाचा पोशिंदा असणारच शेतकरी देशोधडीला लागलाय त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ या सरकारला नाही.
या काळात सरकार जर शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही तर शेतकरी नाउमेद होईल .तो भविष्य काळात फळपिके व भाजीपाला पिकवणार नाही अशी भिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
खरीब हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे त्या *शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची भूमिका जाहीर होणे गरजेचा आहे .ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल त्या *शेतकऱ्याचं पुनर्घटन करून पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.* *खरीप हंगामासाठी बी- बियाणे ,खते मोफत अथवा अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे*. हे जर शासनाने नाही केले शेतकऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो त्याचे परिणाम येणाऱ्या काळात शासनास भोगावे लागतील असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
कर्जमाफी होईल तेव्हा होईल पण पहिले आता *या हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून देणे आणि मोफत बी-बियाणे, खते उपलब्ध करणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांनी फळपिके व भाजीपाला लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना हेक्टरी १लाख ₹ व ५० हजार ₹ हेक्टरी नुकसान भरपाई शासनाने द्यावे. अशी मागणी पांडुरंग शिंदे यांनी सरकारकडे केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा