"लाँकडाऊन काळात नांदेड जिल्ह्यात एकजरी दिव्यांग भुकबळीने मृत्यु पावल्यास संबंधीत अधिकार्यावर "दिव्यांग मणुष्य वधाचा" गुन्हा दाखल करावा राहुल साळवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनीधी :- (लाँकडाऊन) संचारबंदीमुळे नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ आली आहे तसेच या लाँकडाऊनमुळे होता तो हाताचा रोजगार हि बुडाला आहे आणि दैनंदिन जीवनात लागत असलेल्या जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी कुठलेच पैसे नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना हि मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.एकिकडे शासनस्तरावरून दिव्यांगांना या लाँकडाऊन काळात विविध योजना राबविल्या जात आहेत त्यात घरपोच राशन किट देण्याच्या.जिवनावश्यक वस्तु देण्याच्या.सँनीटायझर. मास्क.रूमाल. कम्युनिटि किचनद्वारे जेवण देण्यासहित एक महिण्याचे 1000 रूपये मानधन अँडवान्स मध्ये देण्याच्या सुचना याआधीच दिल्या आहेत परंतु नांदेड जिल्ह्यात अद्याप एकाही दिव्यांगाला जिवनावश्यक वस्तुसह अन्न धान्याचा एक हि कण दिला गेला नाही आहे. आज जिल्हास्तर असेल किंवा तालुकास्तर असेल विविध दानशुर व्यक्तिंनी अन्न धान्याच्या पुरवठ्यासह सर्व जीवनावश्यक वस्तु प्रशासकिय अधिकार्यांजवळ जमा केले आहे. आज जिल्हा स्तर असेल किंवा तालुका स्तर असेल विविध सामाजिक संघटणा.दाणशुर व्यक्ती.गुरूद्वारा बोर्ड.विविध ट्रस्ट - सस्था ह्या आप आपल्या परिने गोरगरीबांना जेवण वाटत आहेत तर कोणी अन्न धान्यासह राशन किट देत आहेत.मग हा जमा होत असलेला अन्न धान्य पुरवठा नेमका जातो तरी कुठे ? या पुरवठ्यावर लोकप्रतिनिधींचाच तर नेमका डोळा नसेल ना ! ते आप आपल्या मतदार संघात तर वाटत नसतील ना ! अशा एक ना अनेक शंका पुढे येत आहेत.काही ठिकाणी तर दिव्यांगांना अल्प प्रमाणात धान्य देऊन तसेच जेवणांचा डब्बा देऊन संख्या वाढवुन सांगितली जाते आणि मोठा गवगवा करत टेंभा मिरविला जातो. आज जवळपास एक महिणा होत आहे लाँकडाऊन संचारबंदीचा या काळात तालुकास्तर असेल अथवा जिल्हास्तर असेल दिव्यांगांनी वेळोवेळी मदतीची विनंती केली आहे परंतु पदरी केवळ आश्वासन आणि निराशाच मिळाली आहे परिणामी ऊपासमारीमुळे तसेच आर्थिक संकटामुळे दिव्यांगांमध्ये भुकबळीने मृत्यु पावण्याची दाट शंका ऊपस्थित झाली आहे याच्याच निषेधार्थ बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आपले सरकार या पोर्टलवर मुख्यमंत्री श्री.ऊद्धव ठाकरे यांना तक्रार दाखल केली आहे आणि या तक्रारित म्हटले आहे कि लाँकडाऊन काळात नांदेड जिल्ह्यात एकजरी दिव्यांग भुकबळीने मृत्यु पावल्यास संबंधीत अधिकार्यावर तो जिल्हास्तरावरील असो वा तालुका स्तरावरील त्यांच्यावर दिव्यांग मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करा आणि असे गुन्हे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यात करावे असे एका प्रसिसिद्धी पत्रकात राहुल साळवे यांनी म्हटले आहे.
bahu kupa cangle vihcare ahite👍👌🙏🙏🌹🌹
उत्तर द्याहटवा