नायगाव बाजार-
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नरसी येथे आज जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी चहा किटचे वाटप केले विशेष म्हणजे स्वता चहा बनवून येथील कर्मचारी बांधवांना दिले.
देशासह राज्यात कोरोना मुळे उदभवलेल्या गंभीर परिस्थितीने सर्वञ लाॅकडाउन करण्यात आले आहे संचारबंदी लागू असल्याने ग्रामीण भागात सर्व व्यवहार बंद आहेत. बाजार पेढा कडकडीत बंद असून फक्त जिवन अवश्यक वस्तुची किराणा दुकान चालू आहेत दरम्यान सर्व सामान्य नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून फक्त बॅका सुरू आहेत नरसी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू आहे.पण येथील कर्मचारी बांधवांना सर्व बाजार पेठा बंद असल्याने चहा मिळणे कठीण आहे. हि बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी आपल्या वतीने या बॅकेत आज चहा किटचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे स्वता चहा बनवून येथील कर्मचारी बांधवांना दिले.
यावेळी शाखेचे शाखाधिकारी नरसिंग राऊत, कॅसियर बामणे, कारखून कोत्तावार, शिपायी तळणे,सह नागरिक उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा