शहरातील वाढती रूग्न संख्या पाहता एकमेकांवर ताषेरे ओढण्यापेक्षा आतातरी एकजुटीने लढा ऊभारला पाहिजे - राहुल साळवे
जिल्हा प्रतिनिधी दि 3 में :- कोरोना या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात गत दिड महिण्यापासुन अहोरात्र जीवाची बाजी करत स्वताचा जीव धोक्यात घालून पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग, महसूल विभाग, महानगरपालिका यासह ईतर ते सर्व प्रशासकिय विभाग आणि दररोजचे अपडेट देणारे ते सर्व पत्रकार आणि टिव्हि चँनल प्रतिनीधी ज्यांनी जवळपास एक महिना जिल्ह्यात एकहि कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण मिळणार नाही याची काटेकोरपणे खबरदारी घेत ऊल्लेखनीय कामगीरी बजावली परंतु पिरबुर्हान नगर येथील पहिल्या पाँझिटिव्ह रूग्नांने जिल्हा प्रशासनासह नांदेड वासियांची देखील धडधड वाढवली नंतर परत एक अफचलनगर येथील पाँझिटिव्ह रुग्ण सापडला त्यानंतर सेलु येथील महिलेचा रिपोर्ट हि पाँझिटिव्ह येत आकडा तीनवर झाला होता त्यापैकि पिरबुर्हाण नगर येथील पहिल्या रूग्नाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला परंतु त्यांचा मृत्यु झाला आणि त्याच दिवशी रात्री सेलु येथील महिलेचा हि मृत्यु झाला त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यभरात विविध अफवा पसरवली गेली.याच दरम्यान लाँकडाऊनमुळे पंजाब येथील शेकडो यात्रेकरी नांदेड येथे गुरूद्वारा दर्शनासाठी आले असता त्यांना जवळपास महिणाभरापेक्षा वर नांदेड मध्येच आडकुन बसावे लागले त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनीधी तसेच हुजुर साहिब नांदेड गुरूद्वारा बोर्ड यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यासह कदाचित केंद्राशी हि पाठपुरावा करत त्या यात्रेकरूंना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी काहि खाजगी ट्रँव्हल बसेसची व्यवस्था करून रवानगी केली,या यात्रेकरूंच्या रवानगीचे वेगळेच चित्र नांदेड वासीयांना पाहावयास मिळाले जो तो या रवाणगीचे श्रेय स्वत: घेत होता परंतु काहि दिवसातच नांदेड येथुन पंजाब येथे पोहचलेल्या यात्रेकरूं पैकि बर्याच जनांची टेस्ट पाँझिटिव्ह आढळल्याचे निष्पन्न झाले आणि खबरदारी म्हणुन परत आलेल्या चालकांना अर्धापुर येथूनच काँरंनटाईन करत रूग्णालयात आणल्या गेले आणि त्यांचे स्वँब तपासणीसाठी पाठवले असता त्यातील तीन चालक कोरोना पाँझिटिव्ह असल्याचे आढळले आणि परत जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा मजबुत करत गुरूद्वारा कर्मचारी यांच्या टेस्ट तपासणीसाठी पाठवले असता काल दि 2 में 2020 रोजी त्यातील 20 जनांचे रिपोर्ट पाझिटिव्ह आढळले आणि एकुण आकडा 26 झाला होता त्यानंतर आज दि 3 में 2020 रोजी परत तीन रूग्नांची वाढ होऊन आकडा 29 झाला त्यातील दोन जनांचा आधीच मृत्यु झाल्यामुळे आणि हा आकडा कदाचित मोठ्या आकड्यात रूपांतरित होऊ शकेल यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत सर्व परीसर सिल केले आणि परत नांदेड जिल्हा हादरून गेला.
या वाढत्या रूग्ण संख्येवरून संपुर्ण जिल्हाभरात विविध चर्चांनी घर केले आहे आज प्रत्येकाचे म्हणने आहे कि पंजाब येथुन नांदेडला आलेल्या यात्रेकरूं पैकि कोणी देश विदेश दौरे करून आलेला होता का ? त्यापैकि कोणी सुरूवातीपासुनच संक्रमीत होता का ? त्यांची तपासणी का केली गेली नाही ? चालक जेंव्हा पाच ते सहा राज्य ओलंडण्यासाठी निघाले होते तेंव्हा खबरदारीचे ऊपाय म्हणुन सर्व अत्यावश्यक आरोग्य सुविधेसह पिपिई किट त्यांना देण्यात आली होती का ? यात्रेकरूंना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी गाजावाजा करून श्रेय घेणारे आज नांदेड जिल्हात एकाएकी वाढलेल्या पाँझिटिव्ह रूग्नांच्या आकड्यांचे श्रेय आणि नांदेड वासियांवर ओढावलेल्या या संकटाचे श्रेय घेतील का ? काहि चांगले झाले तर माझ्यामुळे झाले आणि काही वाईट झाले तर त्याच्यामुळे झाले हि प्रवर्ती आतातरी थांबेल का ? शहराबाहेर नेलेल्या शासकीय रुग्णालया पर्यंत रूग्न वेळेवर पोहचु शकेल का ? शासकीय रूग्नालयात अशा रूग्नांसाठी व्हेंटिलेटरसह ईतर महत्वाच्या आरोग्य विषयक बाबींचा तुटवडा तर नाही बसणार ना ? वाढत्या रूग्नांची संख्या पाहता खाट तर कमी पडणार नाहीत ना ?जनतेच्या सेवेसाठी निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन जनतेला भुकबळीपासुन वाचवतील का ? अशा एक ना अनेक चर्चां गल्लीबोळात एकण्यास येत आहेत यावर विष्णुनगर नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे कि,शहरातील वाढती पाँझिटिव्ह रूग्नांची संख्या पाहता एकमेकांवर ताषेरे ओढण्यापेक्षा आतातरी सर्वांनी एकजुटीने लढा उभारला पाहिजे तसेच लाँकडाऊनमुळे ऊपासमारीच्या संकटात सापडलेल्या हजारों लोकांना दररोज दोन वेळ जेवण पुरविणाऱ्या गुरूद्वारा लंगरवरच कोरोनाचे सावट पसरले आहे हा आकडा वाढु नये यासाठी सर्वांनी प्रार्थणा करत हुजुर साहेब लंगर बोर्डाला सहकार्य करावे या वाढत्या संख्येमुळे लंगर बंद करण्यात आले आहे त्यामुळे आता विविध दानशुर व्यक्तींनी,सेवाभावी सामाजिक संस्थांनी थेट गरजवंतापर्यंत कशी तातडीची मदत पोहचेल यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे तसेच राहुल साळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रात नांदेड वासियांना आवाहण करून कळकळीची विनंती हि केली आहे कि कृपया अफवा पसरऊ नका आणि पसरू देऊ हि नका तसेच विविध दानशुर व्यक्तींकडुन होत असलेल्या मदतीचा साठा न करता खर्या गरजवंताला ज्याला आजवर एक धान्याचा कण हि नाही भेटला अशांना आता तरी मदत मिळू द्या आपल्या या हवासापोटि बर्याच दानशुरांचे मने दुखावली गेली आहेत तीच ती नावे सर्वांकडेच आढळत आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासन हि हवादिक आहे असे म्हणत राहुल साळवे यांनी परत भावनीक आवाहन करत सर्व जनतेस घरात रहा,सुरक्षित रहा,बिनाकामाचे घरा बाहेर जाने टाळा आणि प्रशासनास सहकार्य करा असे म्हटले आहे.
________________________________________
जनतेस आवाहण"' अफवा पसरऊ नका आणि पसरू देऊ हि नका तसेच दानशुर व्यक्तींकडुन होत असलेल्या मदतीचा साठा न करता खर्या गरजवंतापर्यंत मदत पोहचु द्या,घरात रहा,सुरक्षित रहा,बिनकामाचे घराबाहेर जाने टाळा :- राहुल साळवे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा