नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी - मुख्याधिकारी जी.एस.पेंन्टे ,दुस-यांदा आरोग्य तपासणी,सर्वेक्षण सुरू
कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार कोविड 19 आजार समुळ उच्चाटनसाठी शहरातील प्रत्येक घरातील सर्व सदस्यांचे दुस-यांदा आरोग्य तपासणी,सर्वेक्षण करण्यात येत असून.यापुर्वी पालीका प्रशासनतर्फे शहरातील 50 व त्या पेक्षा जास्त वयगटातील नागरीकांचे कोमाॅर्बीडीटी सर्वेक्षण पुर्ण झाले.
25 जुलै पासून शहरात विधानसभेच्या 10 बुथ प्रमाण नुसार शिक्षकांचे 10 पथक नियुक्त करून प्रत्येक पथकाला देण्यात आलेल्या बुथवाईज मतदार यादी प्रमाणे नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.यात नागरीकांचा शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण व तापमानाचे प्रमाण तपासणी करण्यात येत आहे.हे तपासणी पथक तपासणी करून परिपत्रक (अ) प्रमाणे माहिती संघटीत करून न.प.समन्वय अधिकारी रेंगडे यांच्याकडे दररोज माही देत आहे.
तसेच यापुर्वीचा प्रथम टप्यातील कोमाॅर्बीडीटी सर्वेक्षणात शहरातील 50 वर्ष वय गटातील व त्या पेक्षा जास्त वयगटातील नागरीकांचे बी.पी,शूगर,पल्स ऑक्सीमिटर,थर्मलगणने तापमानाचे प्रमाण तपासणी करण्यात आले होते.
एकंदरीत कुंडलवाडी शहरात जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार कोविड 19 आजार समुळ उच्चाटनसाठी नागरीकांचे आरोग्य तपासणी बाबत दिलेल्या आदेशाचे पालन होत असल्याचे दिसायला मिळत आहे.
____________________
______
शहरातील नागरीकांनी आपला आजार अंगावर काढूनये.आरोग्य तपासणी करून घ्यावे.
पथकातील सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे द्यावीत.पथक आपल्या दरवाजावर आल्यावर घरातील सर्व सदस्य एकेकाने घराबाहेर यावे.सर्व सदस्य यांनी तोंडाला मोठी दस्ती/ गमचा/ मास्क लावून तोंड झाकून घ्यावे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी व्यवस्थित स्वच्छ हात धुवून घ्यावे.सर्वेक्षण पथक थर्मलगण व ऑक्सिमीटर द्वारे नागरिकांचे शरीरातील तापमान व ऑक्सिजन चे प्रमाण तपासणार आहे त्यामुळे एका वेळी एकाच सदस्याने तपासणी करून घ्यावी व शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करावे.पथक आपल्यासाठी आलेले आहे व शासकीय कर्तव्यावर आहे त्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी.असे आवाहन मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे नगर परिषद कुंडलवाडी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
लय भारी पोरा..
उत्तर द्याहटवा