कुंडलवाडी नगर परिषद अंतर्गत मियावाकी पद्धतीने 1250 वृक्षांची लागवडमुख्याधिकारी व उपाध्यक्ष यांचा पुढाकार
कुंडलवाडी प्रतिनिधी
जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,नगर उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांच्या पुढाकाराने शहरातील बौद्धस्मशानभूमी,डम्पींग यार्ड अशा विविध ठिकाणी विविध प्रजातींचे फळे फुलांचे बाराशे पन्नास झाडाची लागवड मियावाकी आनंद घनवन योजनेच्या पद्धतीने लागवड करून स्मार्ट सिटी,ग्रिन सिटी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेवून यावर्षीचे वृक्ष लागवडीचे संकल्प पुर्ण करण्यात आले आहे. कुंडलवाडी नगर परिषद मुख्याधिकारी व उपाध्यक्ष यांचा पुढाकार गेल्या दोन वर्षात दहा हजार वर्षाचे लागवड शहराती विविध प्रभागात,मुख्या मार्गावर,के.रामलू मंगल कार्यालय,शेख शपाशावली दर्गा,हिंदू स्मशानभूमी आदी ठिकाणी करण्यात आले आहे.तसेच वृक्षारोपण करून त्यांचे संगोपण,जपवणूक काळजी घेण्यात आल्याने आज शहरात ईत्रत हिरवळ वातावरण दिसायला मिळत आहे.
यापुढेही विविध ठिकाणी विविध प्रजातीचे वृक्षरोपण करण्यात येणार.
तसेच शहरातील प्रत्येक कुटुंबाणी किमान एक वृक्ष लावावे.व त्याचे संगोपण करावे.असे आवाहन शहरातील नागरीकाना
मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा