कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
शहरापासून जवळच असलेल्या हुनगुंदा या गावात अॅटिजन रॅपीड टेस्टमध्ये
सोमवार रोजी तीन रुग्ण कोरोन पाँझिटिव्ह आढळले असल्याची माहिती डाॅ. बालाजी सातमवाड यांनी दिली.
तालुक्यात कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसून येत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. प्रशासन साखळी तोडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असले तरी दि.१० आँगस्ट रोजी हुनगुंदा येथे अॅटिजन टेस्ट किटद्वारे चाचणी केली असता ३ जण कोरोना पाँझिटिव्ह आढळले आहेत.बाळापूर ता.धर्माबाद येथील एक खाजगी डॉक्टर गावामध्ये येऊन अनेकांवर उपचार केला आहे. त्या डॉक्टराच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत असून १० आँगस्ट रोजी १८ जणांची अॅटिजन टेस्ट केली यातील ३ रूग्ण पाँझिटिव्ह आढळले असुन ११ आँगस्ट रोजी हुनगुंदा येथे आणखी काही जणांची अॅटिजन टेस्टद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा