सोलापूर प्रतिनिधी : डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार अशी माहिती आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारने नवा अध्यादेश ही काढलाल आहे. त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे असे ही आदेशामध्ये स्पष्ट केले आहे डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यावर दोन लाख रुपयापर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे असंही त्यांनी सांगितले.सरकार आपल्याला सुरक्षा पुरवत आहे. तुम्ही आंदोलन करु नका; आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी यांची सर्व डॉक्टरांना विनंती सध्या करोनाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हे प्राणांची बाजी लावून लढत आहेत. मात्र त्यांच्याविरोधात हिंसा करण्याचे, त्यांना ही वागणूक देण्याचे प्रकार देशात घडले हे दुर्दैवी आहे. यापुढे हे मुळीच सहन केले जाणार नाही. याचसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. Epidemic Diseases Act, 1897 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. तसेच तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि ५० हजार ते २ लाखापर्यंतचा दंडही वसूल करण्यात येईल असे ही माहिती डॉ.आमीर मुलाणी यांनी दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा