कुंडलवाडी (मो.अफजल)
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि धर्माबाद उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस ठाणायाचे सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी व त्यांचे पोलीस कर्मचारी यांच्यावतीने दुचाकी वाहन तपासणी अभियान राबवून
विना नंबर,कागदपत्रे नसलेल्या एकूण 20 दुचाकी पकडून दुचाकी जप्त करण्यात आल्यामुळे अनेकांची धावपळ झाली.
जिल्हात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने येथील पोलीस ठाण्याचे शहरातील डाॅ.हेडगेवार चौक,नवीन बस्थानक,चुंगी नाका आदी ठिकाणी दुचाकी वहान तपासणी अभियान राबविण्यात आले.या कारवाई 20 दुचाकी पकडून दुचाकी जप्त करण्यात आल्यामुळे अनेकांची धावपळ झाली.
दुचाकी तपासणी मोहीमेत कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी,ए.एस.आय.अशोक पाटील इंगळे,ए.एस.आय.यादव जाभळीकर,डी.एस.बी.चे गजानन अनमुलवार,पोका.शेख नजीर,गणपत कंदकवाड,महेश माकुलवार,ईद्रीस बेग,
संजय चापनकर,सुंदर्शन कमलाकर,दिलीप जाधव,रघुनाथसिह चव्हाण,राम आडे,पचलिंग वाहन चालक शेख अलीम आदींचा समावेश होता.
________________________
शहरात यापुढे ही अशाच प्रकारे दुचाकी विना नंबर,कागदपत्रे नसलेल्या तपासणी अभियान चालूच राहणार तरी कोणीही विना नंबर दुचाकी चालवू नये.पालकांनी लाहान मुलांना दुचाकी चालवायला देवूनये.असे अहवान कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनी सुरेश मान्टे यांच्या तर्फे करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा