कुंडलवाडी (मो.अफजल) प्रतिनिधी माचनूर येथे 19 अॉगस्ट रोजी पती,पत्नीचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्या नंतर
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावक-यातर्फे दि.20 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट पर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यशस्वीरीत्या पाळे जात आहे. रूग्ण राहात असलेल्या म्हेत्रे गल्लीस काॅन्टेन्टमेन्ट झोन म्हणून जाहीर करून परीसर सील करण्यात आले व नागरीकास प्रवेश बंदी करण्यात आले आहे.
तसेच यापुढे काॅन्टेन्टमेन्ट झोन मधील प्रत्येकाची व गावातील नागरीकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड,माचनूर उपकेंद्रचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.पठाण रूबीया खानम यांनी दिली.
विशेष म्हणजे माचनूर येथील आरोग्य उपकेंद्रात नुकतेच वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झालेले .डाॅ.पठाण रूबीया खानम यांनी व त्यांचे आरोग्य कर्मचारी वानोळे,आशा वर्कर आदी परिश्रम घेत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा